आर एस एस
आर एस एस याचे पूर्ण नाव ‘ रिअली सिंपल सिंडिकेशन’ असे आहे. याचा वापर वेब मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आरएसएस ला फीड या नावाने देखील ओळखले जाते. हि एक पद्धती आहे. कि ज्यात आपल्याला ब्लॉग वरील किंवा वेब साईट वरील माहिती आपल्याला हव्या त्या पद्धतीत पाहू शकतो. आरएसएस चा वापर करून तुम्ही ब्लॉग वरील किंवा वेब साईट वरील नवनवीन अद्ययावत माहिती त्या वेब साईट वर न जाता पाहू/वाचू शकता. तुम्ही हव्या त्या ब्लॉगचा किंवा वेब साईट चा अशा पद्धतीने आरएसएस बनवून ठेवू शकता.
आरएसएस हा XML फाईल मध्ये असतो. पहिली आरएसएस फीड नेटस्क्याप नावाच्या वेबसाईट ने मार्च १९९९ मध्ये केली. 0.91, 1.0, आणि 2.0 अशी या आरएसएस मधील वर्जनची नावे आहेत. गूगल रीडर, आय गूगल, माय याहू, लैव्ह. कॉम अशी काही फीड ची नावे आहेत याचा वापर करून तुम्ही आरएसएस वापरू शकता.