हेमंत आठल्ये

पुण्यात स्वाइन फ्लूचे ३३ बळी

In बातमी, म. टा. खास on सप्टेंबर 3, 2009 at 12:20 सकाळी

म. टा. खास- स्वाइन फ्लूने ५३ वर्षाच्या राजेंद्र डाके यांचा पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या मृत्यूमुळे स्वाइन फ्लूच्या पुण्यातील बळींची संख्या ३३ झाली आहे.

याआधी मंगळवारी भोर तालुक्यातील सात वर्षांची मुलगी स्वाइन फ्लूने दगावली . भोर येथील वीरवाडीमध्ये राहाणा-या प्रियांका अंकुश शिळीमकर या सात वर्षांच्या मुलीला २१ ऑगस्टला फ्लू झाला . तिला २८ तारखेला पुण्यात सहकारनगरमधे खाजगी हॉस्पिटलात आणण्यात आले . तेथे उपचार करून तिला घरी सोडले ; मात्र दुस-याच दिवशी तब्येत बिघडल्याने तिला ससूनमध्ये दाखल करण्यात आले . त्यावेळी तिला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले . दोन दिवस ती व्हेंटिलेटरवरच होती . मंगळवारी पहाटे प्रकृती खालावली आणि सकाळी तिचा मृत्यू झाला .