हेमंत आठल्ये

इचलकरंजीत संचारबंदी

In बातमी, सकाळ on सप्टेंबर 7, 2009 at 11:04 pm

सकाळ– स्वागत कमानीवरून मिरजेत सुरू झालेल्या दंगलीचे लोण लगतच्या इंचलकरंजीमध्ये सोमवारी वेगाने पसरले. समाजकंटकांनी दिवसभरात शहरातील शेकडो दुकानांची आणि वाहनांची मोडतोड करून त्यांना आग लावली. लिंबू चौक परिसरात एका तरुणाचा तलवारीने भोसकून खून करण्यात आल्याने परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण बनली. शहरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Advertisements

मिरजेत प्रशासनाकडून गणपतींचे विसर्जन

In बातमी, सकाळ on सप्टेंबर 7, 2009 at 1:04 सकाळी

शहरात प्रशासनाकडून सायंकाळनंतर सार्वजनिक गणेश मडंळाच्या श्रींचे विसर्जन सुरू करण्यात आले. प्रचंड पोलिस बंदोबस्तात पंढरपूर रस्त्यावरील श्रीमंत गणेशोत्सव मंडळ आणि मंगळवार पेठेचा राजा, शिवाई गणेशोत्सव मंडळ या तीन मुख्य गणपतींचे विसर्जन प्रशासनाने महापालिकेच्या यंत्रणेद्वारे केले. संचारबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणाखाली येत असल्याचे दिसताच जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त, महापालिकेचे पंचवीस कामगार, वाहने, मोठ्या मूर्ती उचलण्यासाठी क्रेन, कृष्णाघाटावर मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विशेष यंत्रणा हा सगळा लवाजमा प्रशासनाने तयारच ठेवला होता.

सांगली-मिरजेत ‘शांत’ अशांतता

In बातमी, म. टा. खास on सप्टेंबर 5, 2009 at 10:33 pm

म. टा. खास– गणेशोत्सवातील ‘अफझलखानाचा वधा’चा देखावा असलेल्या कमानीच्या उभारणीवरून उद्भवलेल्या मिरजेतील हिंदू-मुस्लिम जातीय दंगलीचे लोण आता सांगली जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांतही पसरत आहे. बंद, दहशत, भीती व दंगलग्रस्त अशांत परिस्थितीमुळे सांगली-मिरजेतील सामान्य जनता तीन-चार दिवस जीव मुठीत घेऊन जगताना दिसत असून, सर्वत्र अघोषित संचारबंदी सुरू असल्याप्रमाणे कडकडीत ‘बंद’चे येथे वातावरण आहे.