हेमंत आठल्ये

मराठी लोकंबद्दल काही मते

मुंबईतील मराठी माणसाची हिंदीत बोलण्याची घानेरडी सवय एक दिवस त्याच्याच सर्वनाशाला कारणीभूत ठरणार आहे. ज्याला आपल्या मातृभाषेत बोलायची लाज वाटते, त्याला त्याच्या आईच्या दुधाची देखील लाज वाटत असावी. – आचार्य अत्रे 

मुंबईतील मराठी माणसाला लोकल ट्रेन, ऑफीस अशा ठिकाणी हिंदीत बोलण्याचा रोग जडलेला आहे. त्यातल्या मराठी मुलींना हिंदीत बोलण्याची घाण खोड असते. गमतीची गोष्ट ही की हे लोक चांगले मराठी शकत नाही की चांगले हिंदी ही बोलू शकत नाही. त्रिशंकू सारखी यांची अवस्था होताना दिसते. – व्ही. शांताराम

मराठी माणसाने स्वत: परप्रांतीयाशी बोलताना मराठीमध्येच बोलले पाहिजे. तुम्हीच जर परप्रांतीयाबरोबर हिंदीत बोलायला सुरवात केली तर समोरचा परप्रांतीय कशाला मराठीत बोलेल? मराठी शिवाय आपले काय अडत नाही असा समज परप्रांतियाचा याच मुळे झाला. –  पु ल देशपांडे

 1. हे सर्व विचार अगदी योग्यच आहेत. याबाबतीतील टिळकांचे विचार खालील दुव्यावर पहायला मिळतात.

  http://amrutmanthan.wordpress.com/2009/08/12/पिठांत-मीठ-ले०-लोकमान्य-ट/

  इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांपुढे मराठी माणसाला न्यूनगंड का वाटतो हेच समजत नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा गैरसमजही त्यास कारणीभूत असावा. महाराष्ट्रात बॅंका, टपाल खाते, केंद्रसरकारी कार्यालये, सार्वजनिक उद्योगांची कार्यालये अशा सर्व ठिकाणी हिंदी आणि त्याच बरोबर इंग्रजी भाषा सर्वत्र दिसते पण राज्यभाषा मराठी मात्र कटाक्षाने टाळली जाते. आणि त्याबद्दल मराठी माणसाला काहीही खंत किंवा खेद वाटत नाही. ही थेरं इतर कुठल्याही प्रगत किंवा अप्रगत राज्यात चालवून घेतली जात नाहीत. हिंदी राष्ट्रभाषेबद्दल खालील अभ्यासपूर्ण लेखही मला चांगला वाटला. वाचून पहावा.

  http://amrutmanthan.wordpress.com/2009/07/21/15/

  “मराठीसाठी काहीही” असे आपले ब्रीदवाक्य असल्यामुळे मुद्दाम लिहिले. आपण सर्वांनी स्वभाषा व स्वसंस्कृतीप्रेमाचा वणवा सर्वत्र पसरवायला पाहिजे. आपली मते अवश्य कळवा. आभार.

 2. या आधीच्या अभिप्रायात माझा विरोप पत्ता चुकीचा नोंदवला गेला. योग्य पत्ता sameerjoshi6463@gmail.com असा आहे.

 3. yabaddal purnapane vichar zalach pahije

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: