हेमंत आठल्ये

इंडियन मुजाहिदीनचे 'नामकरण' अंधेरीत

In बातमी on ऑक्टोबर 14, 2008 at 10:00 सकाळी

‘ स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’च्या (सिमी) छत्रछायेतून बाहेर पडलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’चे (आयएम) ‘नामकरण’ अंधेरी रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या मॅकडोनाल्ड्समध्ये पार पडल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्याबरोबरच ई-मेलच्या मदतीने दहशत निर्माण करण्याचा निर्णयही याच बैठकीत घेण्यात आला होता.

 

इंडियन मुजाहिदीनचे ‘नामकरण’ अंधेरीत

इंडियन मुजाहिदीनचे ‘नामकरण’ अंधेरीत

 दिल्ली एन्काऊंटरमध्ये मध्यंतरी ठार झालेला दहशतवादी आतिफ, रियाझ भटकळ आणि सादिक या त्रिकुटाने हा निर्णय २००६ मध्ये झालेल्या बैठकीत घेतला.

सन २००६ चा ऑक्टोबर उजाडत असतानाच देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट या त्रिकुटाने मॅकडोनाल्ड्समध्ये शिजवला. ‘सिमी’च्या सावलीतून बाहेर पडत, कडव्या तरुणांची संघटना बांधायची व देशभरात विध्वंस घडवायचा, या हेतूने ‘आयएम’ची स्थापना झाली. कुठल्याही घातपातानंतर संशयाचा काटा ‘सिमी’कडे वळतो, त्यामुळे आपल्या हस्तकांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांचे संपूर्ण ‘श्ाेय’ आपल्याच संघटनेला मिळावे, अशी भूमिका आयएमच्या स्थापनेमागे होती. 

सध्या फरार असलेला आयएमचा संस्थापक सदस्य रोशन खान ऊर्फ रियाझ भटकळ, त्याचा साथीदार मोहम्मद सादिक शेख आणि आतिफ हे त्यावर खल करण्यासाठी अंधेरीच्या मॅकडोनाल्ड्समध्ये भेटले. देश हादरवणारे बॉम्बस्फोट घडवून आयएमचे नाव अधिक प्रकर्षाने समोर येईल, अशी योजना त्यावेळी आखण्यात आली. 

याच वेळी ई-मेल धमकीसत्राचा निर्णय झाला. त्यावेळी फक्त सादिकने, मुंबई पोलिसांची करडी नजर आपल्या कारवायांवर पडेल, अशी भीती व्यक्त केली. मात्र त्याचे म्हणणे इतरांनी खोडून काढले. यानंतर २४ नोव्हेंबर २००६ रोजी उत्तर प्रदेश हादरवणाऱ्या बॉम्बस्फोटानंतर प्रथम ई-मेलचे सत्र सुरू झाले. त्यांच्या बैठकीनंतर आयएमचे सदस्य आक्रमकपणे कार्यरत झाले, अशी माहिती पोलिस सहआयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांनी दिली. 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: