हेमंत आठल्ये

काळबादेवीत मोठी आग, एकाचा मृत्यू

In बातमी on ऑक्टोबर 14, 2008 at 10:10 सकाळी

काळबादेवी भागातील विजया बँकेच्या जोहरी मेन्शन बिल्डिंगला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर पाच जण जखमी झालेत. सकाळी पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच इमारतीतल्या कापडाच्या गोदामांनीही पेट घेतला. अग्निशमन दलाची १० फायर इंजिन, ६ टँकर आणि तीन अँम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं समजतं. 

सकाळी अकराच्या सुमारास विजया बँकेच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. या आगीचं वृत्त कळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे रवाना झाल्या ख-या, पण अरुंद रस्ते आणि त्यावर भरलेल्या दिवाळीच्या बाजारामुळे त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. या दरम्यान, आग बरीच वाढली. इमारतीत कापडाची बरीच गोदामं असल्यानं पाचही मजले आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. शेजारच्या इमारतीच्या दिशेनंही आग पसरू लागली होती. 

ऐन कामाच्या वेळी आग लागली असल्यानं, काही माणसं आत अडकल्याची भीती व्यक्त होत होती. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवलं. परंतु, त्या दरम्यान आगीत पाच जण किरकोळ जखमी झाले. आग आटोक्यात आल्यानंतर, एका व्यक्तीचा मृतदेहही अग्निशमन दलाच्या जवानांना सापडलाय. त्याची ओळख अजून पटलेली नाही.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: