हेमंत आठल्ये

जातीय दंगलीत महाराष्ट्र पहिला

In बातमी on ऑक्टोबर 14, 2008 at 6:25 सकाळी

सातत्याने पुरोगामित्वाचे ढोल बडवणाऱ्या आणि समाजसुधारकांचा वारसा पदोपदी सांगणाऱ्या महाराष्ट्रात जातीय हिंसाचाराने कळस गाठला असून गेल्या सुमारे आठ वर्षांमध्ये देशात सर्वाधिक जातीय दंगली महाराष्ट्रात झाल्याची अधिकृत आकडेवारीच समोर आली आहे.

सन २००० ते यंदाच्या सप्टेंबरपर्यंत जातीय द्वेषावरून संघर्ष होण्याच्या तब्बल ६ हजार ४६४ घटना देशात घडल्या. त्यात दोन हजार ३९३ जणांचा बळी गेला आणि हजारो लोक जखमी झाले. ‘नॅशनल इंटिग्रेशन कौन्सिल’च्या सोमवारच्या बैठकीत ही आकडेवारी सादर करण्यात आली. या काळात महाराष्ट्रात अशा एकूण एक हजार ४६ घटना घडल्या. त्यात १५१ बळी गेले. या तुलनेत गुजरातमध्ये जातीय दंगलींची संख्या कमी असली तरी त्यात सुमारे दोन हजार जणांनी प्राण गमावला. त्यातील ९७७ जण तर २००२ मधील भीषण दंगलीत ठार झाले. 

ख्रिश्चनांवरील हल्ल्यांमुळे गेले अनेक दिवस ओरिसा धगधगतेच आहे. आठ वर्षांत ओरिसात १५८ जातीय दंगली झाल्या. त्यामध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकही धुमसत होते. तेथे जातीय हिंसाचाराच्या ५८० घटना नोंदवण्यात आल्या. दंगलींच्या बाबतीत दुसरा क्रमांक उत्तरप्रदेशचा लागत असला तरी हे राज्य सध्या शांत आहे. राज्यात आठ वर्षांत ९४२ दंगलींमध्ये ३३९ बळी गेले. 

सतत संघर्षाच्या छायेत असलेल्या अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मणिपूर, मेघालय, मिझोरम आणि नागालँड या राज्यांमध्ये एकदाही जातीय संघर्ष उद्भवला नाही. दहशतवादाने ग्रासलेल्या जम्मू काश्मीरमध्येही आठ वर्षांत जातीय हिंसाचाराच्या केवळ १२ घटना घडल्या. त्रिपुरा, उत्तरांचल आणि गोव्यातही अगदी तुरळक प्रकार घडले.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: