हेमंत आठल्ये

हा तर ज्याचा त्याचा प्रश्न – नाना पाटेकर

In बातमी on ऑक्टोबर 15, 2008 at 6:09 सकाळी

नाना पाटेकर 

लिव इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कायदा करणार असल्याचं जाहीर झालं आहे. तो कायदा काय असणार आहे, हे मला माहीत नाही. कायदा करावा का न करावा, हा पूर्णपणे राज्य सरकारचा प्रश्न आहे. काहींना कायदा असावा, असं वाटेल, तर काहींना कायदा असू नये, असं वाटू शकेल. पण मला मात्र त्याबाबत काहीच मत नाही. 

हा तर ज्याचा त्याचा प्रश्न - नाना पाटेकर

हा तर ज्याचा त्याचा प्रश्न - नाना पाटेकर

मुळात लिव इन रिलेशनशिप योग्य आहे की नाही, हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. विवाह करून राहावं की विवाह न करताच एकत्र राहावं, हा संबंधित दोन जणांचा प्रश्न आहे. विवाह न करता एक स्त्री आणि एक पुरुष यांना राहायचं असेल, तर त्याला मी वा आपण विरोध करणारे कोण? आपण दोन व्यक्तींनी कसं राहावं, वा राहू नये, हे कसं काय ठरवू शकतो. विवाह वा लिव इन रिलेशनशिप ही पूर्णपणे खासगी बाब आहे, असं मला वाटतं. 

 

विवाहाला कायदेशीर मान्यता आहे. लिव इन रिलेशनशिपला अशी कायद्याची मान्यता नाही. पण प्रत्येक गोष्टीला कायद्याची मान्यता आहे का वा समाजाची मान्यता आहे का, हे पाहण्याचं मला वाटत नाही, की काही कारण आहे. जर दोन व्यक्तींची त्यास मान्यता असेल, तर ते पुरेसं आहे. माझ्या परिचयात अशी काही जोडपी आहेत की ती बरीच वर्षं एकत्र राहत आहेत, मात्र त्यांनी लग्न केलेलं नाही. काही जोडपी अशीही आहेत की ती बरीच वर्षं विवाह न करता एकत्र राहत होती आणि त्यांनी काही वर्षांनी एकमेकांशी विवाह केला. पण त्या कपल्सनी विवाह केला वा केला नाही, याचा आणि माझे त्यांच्याशी असलेले संबंध यावर कधीच काही परिणाम झाला नाही. विवाह केला म्हणून उत्तम संबंध आणि विवाह न करता ते एकत्र राहत आहेत, म्हणून मी त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणं, असं मी कधीच केलं नाही. मुळात तसं माझ्या मनातही आलं नाही. 

विवाह म्हणजे नैतिक आणि लिव इन रिलेशनशिप म्हणजे अनैतिक असं अनेकांना वाटू शकतं. पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काय नैतिक आणि काय अनैतिक हे दुसऱ्याने ठरवता कामा नये, असं मला वाटतं. ते आनंदात आहे की नाहीत, हे महत्त्वाचं. 

विवाह हे केवळ कायदेशीरच नव्हे, तर धामिर्क बंधनही आहे, असं म्हटलं जातं. मग जे धामिर्क पद्धतीने विवाह करत नाहीत, त्यांच्या बाबतीत काय म्हणायचं? अनेक जण सिविल मॅरेज अॅक्टनुसार कोर्टात जाऊन विवाह करतात. तिथे धामिर्क बंधन कुठे येतं? तसंच लिव इन रिलेशनशिपबद्दलही म्हणता येईल की! सिविल मॅरेज अॅक्टनुसार केलेला विवाह हा केवळ कागदोपत्रीच असतो ना? 

स्त्रीची फसवणूक होऊ नये म्हणून हा कायदा करण्यात येणार आहे, असं सांगण्यात येतं. स्त्रीची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, अशा मताचा मी आहे. पण विवाह करूनही अनेक पुरुष स्त्रीची फसवणूक करतातच की. त्यामुळे लिव इन रिलेशनशिपमध्येच केवळ फसवणूक होते आणि विवाहात ती होत नाही, असं कसं म्हणता येईल. विवाह करायचा असो की लिव इन रिलेशनशिपमध्ये असो स्त्रीने नीट विचार करूनच निर्णय घ्यायला हवा.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: