हेमंत आठल्ये

६० वर्षांची 'ड्रीम गर्ल'

In बातमी on ऑक्टोबर 16, 2008 at 6:40 सकाळी

‘ ड्रीम गर्ल ‘ म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती हेमा मालिनीच बॉलिवूडची ही लाडकी ड्रीम गर्ल चक्क ६० वर्षांची झालीय… विश्वास बसत नाही ना… पण काळ आणि वय कुणासाठीही थांबत नसतं, हेच खरं… हेमा मालिनीनेही आज साठीमध्ये पदार्पण केलं. परंतु साठीच्या सुरकुत्या तिच्या चेह-यावर अजिबात दिसत नाहीत. ती अजूनही अगदी तश्शीच दिसते… किसी शायर की गझल… ड्रीम गर्ल किसी फुल का कंवल… ड्रीम गर्ल.. !

 

६० वर्षांची ड्रीम गर्ल

६० वर्षांची 'ड्रीम गर्ल'

तू अजूनही यंग दिसतेस, असं हेमाला म्हटलं की, ती अगदी खळखळून हसते… एखाद्या निरागस शाळकरी पोरीसारखी बहुतेक तिला अशा कॉम्प्लिमेन्टस् ऐकायची सवयच असावी. बरोबर.. ? ‘ होय …’ ती सांगत असते… ‘ असं ऐकलं की, मला खूप आनंद होतो. मला अभिमान वाटत नाही, पण मी देवाचे आभार मानते. त्याने मला जे काही दिलं, त्याबद्दल. आणि ते जपणं हे माझं काम आहे… ’ 

 

आज आपल्या ६० व्या वाढदिवशी हेमा मालिनी तिरुपतीला जाऊन बालाजीचे आशीर्वाद घेणार आहे. पण अजूनही मी ६० वर्षांची झालीय, असे मला वाटत नाही, असं ती सांगते. ‘ शेवटी हे सगळं मनात असतं. जर तुम्ही फिट असाल, तुमच्या हृदयात आणि आत्म्यामध्ये कला जिवंत असेल, तर हे असंच सुरु राहतं. आतापर्यंत आपल्या आयुष्याचं प्रवास अगदी झक्कास झाल्याचं तिचं म्हणणं आहे.‘ खूपच सुंदर प्रवास झाला आतापर्यंत. या वाटेवर भरपूर चांगली माणसं भेटली. मुलगी, बहिण, पत्नी, आई असे सगळे अनुभव घेतले. अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, ’ ती सांगत होती. लवकरच ‘ एक थी राणी ऐसी भी ’ नावाच्या चित्रपटात हेमा मालिनी राजस्थानची महाराणी राजमाता विजयाराजे शिंदे यांची भूमिका साकारणार आहे. 

या वाढदिवसाला देवाकडे काय मागणार असं विचारलं असता हेमा म्हणाली, प्रत्येकाची भरभराट व्हावी अशी माझी इच्छा आहे. केवळ माझीच नव्हे तर संपूर्ण देशाची भरभराट व्हावी, असं मला वाटतं. बुजुर्गांनी मला आशीर्वाद द्यावा आणि तरुणांनी शुभेच्छा… हसत हसत हेमा म्हणाली. माझ्या मुली ईशा आणि अहाना यांचं करिअर मार्गी लागावी, एवढीच अपेक्षा आहे. त्या दोघींसाठी खूप काही करायचंय. चांगली अभिनेत्री म्हणून ईशाने नाव कमवावं आणि नंतर करिअर सेटल करावं, एवढीच आई म्हणून माझी इच्छा आहे, असं तिनं सांगितलं. 

हेमा मालिनी आणि त्यांचे पती धर्मेंद्र हे एकेकाळचं बॉलिवूडमधील हॉट कपल… सौंदर्याची खाण असलेली हेमा आणि हिमॅन धर्मेंद्र यांची ऑनस्क्रीन जोडी रसिकांची आवडती… आताही धरमपाजींसोबत एखाद्या चित्रपटात काम करावं, असं नाही वाटतंया प्रश्नावर ती लाजते. सध्या तरी असा काही प्लान नाही आणि तसा प्रस्ताव समोरच्या बाजूने यायला हवा ना, असं ती सूचकपणे सांगते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: