हेमंत आठल्ये

पती-पत्नी नात्यालाही सेन्सेक्सचा फटका

In बातमी on ऑक्टोबर 18, 2008 at 8:52 pm

शेअर बाजार कोसळल्याने आर्थिक फटका तर बसतोच, परंतु नवरा-बायकोचे नाजुक नातेसंबंधही धोक्यात येऊ शकतात. अहमदाबादमधील एक महिला सध्या त्याचा अनुभव घेतेय… शेअर बाजार कोसळल्याने या महिलेला ३० लाख रुपयांचा फटका बसला. त्यामुळे तिच्यावर चिडलेल्या नव-याला घटस्फोट हवाय, अशी कैफियत या महिलेनेच मांडली आहे.

‘ मी ३४ वर्षांची गृहिणी आहे. दहा वर्षांपूर्वी माझे लग्न झाले, मला एक मुलगी आहे. मोकळ्या वेळात मी शेअर बाजारात ऑनलाइन ट्रेडिंग करायची. अनेकदा मला त्यात फायदाही झाला. परंतु सध्या शेअर बाजार कोसळत आहे. मी ज्या कंपन्यांचे शेअर घेतलेत, त्या शेअर्सची किंमत चांगलीच कोसळलीय. त्यामुळे माझे ३० लाख रुपयांचे नुकसान झालेय. माझ्याप्रमाणे इतर अनेकजणांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. परंतु माझ्या नव-याला ते मान्य नाही. तो म्हणतो की, हे आर्थिक नुकसान तो सहन करु शकत नाही. मला जेव्हा शेअर बाजारात फायदा होत होता, तेव्हा तो खूश असायचा. पण आता मार्केटची स्थिती बदलल्यानंतर तोही आता हात काढून घेतोय. या संकटकाळात मला धीर द्यायचे राहिले बाजूला… त्याला घटस्फोट हवा आहे. मी काय करु.. मला मार्गदर्शन करा… ’ अशी याचना केलीय अहमदाबादच्या एका महिलेने 

अहमदाबाद येथील ख्यातनाम मानसोपचारतज्ञ डॉ. हंसल भचेह यांनी फ्री काऊन्सिलिंगसाठी एक वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटवर त्या महिलेने आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. त्या महिलेचे केवळ आर्थिक नुकसान झालेले नाही, तर तिचे लग्नही मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी तिने डॉक्टराकंडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: