हेमंत आठल्ये

‘मिलिनीअर्स’ राजकारण्यांचे भारतावर राज्य

In बातमी on फेब्रुवारी 20, 2009 at 5:03 सकाळी

जिथे ७७ टक्के लोक दरदिवशी जेमतेम २० रुपयांची कमाई करतात आणि सुमारे ३०० मिलिअन जनता जिथे दारिद्र्य रेषेखाली कसेबसे आयुष्य ढकलत आहेत , त्या भारतावर राज्य करणारे खासदार , आमदार , मंत्री आणि मुख्यमंत्री असे राजकारणी मात्र ‘ मिलिनीअर्स लाइफ ’ एन्जॉय करत आहेत.

संसदेतील निम्मे राज्यसभा खासदार आणि एक तृतियांशहून अधिक लोकसभा खासदार करोडपती आहेत , अशी माहिती एका सर्व्हेमध्ये पुढे आली आहे. राज्यसभा आणि लोकसभेतील टॉप टेन खासदारांची एकूण संपत्तीच जवळपास १५०० कोटींच्या घरात आहे.

तर गेल्या लोकसभा निवडणुकीतील हरलेल्या टॉप टेन उमेदवारांची एकूण संपत्ती ९३२९ कोटी रुपये एवढी होती. त्यापैकी एकट्या नागालँडच्या नीमथुंगो नावाच्या उमेदवाराकडेच ९००५ कोटी रुपयांची गडगंज इस्टेट आहे. गंमत म्हणजे खासदारांपेक्षाही ३० राज्यांतील विधानसभा आमदारांकडे अधिक श्रीमंती आहे. प्रत्येक राज्यातील टॉप ५ आमदारांचीच संपत्ती २०४२ कोटी रुपये एवढी आहे. या दीडशे करोडपती आमदारांपैखी ५९ जणांकडे तर आयकर विभागाचे ‘ पॅनकार्ड ’ ही नाही.

याचाच अर्थ आयकर भरण्याशी त्यांचा काडीमात्र संबंध अद्याप तरी आलेला दिसत नाही. भारतातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांच्या यादीत काँग्रेसचे आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदार टी. सुब्बारामी रेड्डी यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यांच्याकडे एकूण २३९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर २१४ कोटी रुपयांच्या मालमत्तेसह समाजवादी पार्टीच्या खासदार , सिनेअभिनेत्री जया बच्चन दुस-या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ तिसरा क्रमांक लागतो उद्योगपती , अपक्ष राज्यसभा खासदार राहुल बजाज यांचा. त्यांच्याकडे १९० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

कर्नाटकातील काँग्रेसचे राज्यसभा खासदार अनिल लाड ( १७५ कोटी रु.) यांचा चौथा , तर काँग्रेसचे आमदार एम. कृष्णप्पा (१३६ कोटी रु.) यांचा पाचवा क्रमांक लागतो. टॉप टेन करोडपती लोकसभा खासदार डी. के. अदिकेसावुलु (तेलगू देसम पार्टी) , चित्तूर , आंध्र प्रदेश – ६६ कोटी रु. प्रेनीत कौर (काँग्रेस) , पतियाळा , पंजाब – ३७ कोटी रु. धर्मेंद्र (भाजप) , बिकानेर , राजस्थान – २३ कोटी रु. प्रतिभा सिंग (काँग्रेस) , मंडी , हिमाचल प्रदेश – २२ कोटी रु. राणा गुरजीत सिंग (काँग्रेस) , जालंधर , पंजाब – २० कोटी रु. पी. चिदंबरम ( काँग्रेस) , शिवगंगा , तामिळनाडू – १८ कोटी रु. मोनीकुमार सुब्बा (काँग्रेस) , तेजपूर , आसाम – १७ कोटी रु. हरुन रशीम जे. एम. (काँग्रेस) , पेरियाकुलम , तामिळनाडू – १५ कोटी रु. कपिल सिब्बल (काँग्रेस) , चांदनी चौक , दिल्ली – १५ कोटी रु. गोविंदा (काँग्रेस) , उत्तर मुंबई , महाराष्ट्र – १४ कोटी रु. महाराष्ट्रातील टॉप पाच करोडपती आमदार बाबा सिद्दीकी (काँग्रेस) , बांद्रा – १२.१ कोटी रु. हितेंद्र ठाकूर (अपक्ष) , वसई – १२ कोटी रु. भास्करराव पाटील (काँग्रेस) , बिलोली – ९ कोटी रु. बबनराव शिंदे ( राष्ट्रवादी काँग्रेस) , माढा – ७.९ कोटी रु. नारायण राणे (काँग्रेस) , मालवण – ७.६ कोटी रु. देशातील टॉप ५ करोडपती मुख्यमंत्री मायावती (उत्तर प्रदेश) – ५२ कोटी रु. एम. करुणानिधी (तामिळनाडू) – ४३.८ कोटी रु. प्रकाशसिंग बादल (पंजाब) – ९.२ कोटी रु. अशोक चव्हाण (महाराष्ट्र) – ६.८ कोटी रु. निफिउ रिओ (नागालँड) – ६.२ कोटी रु. टॉप १० करोडपती महिला खासदार जया बच्चन ( समाजवादी पार्टी) , राज्यसभा , उत्तर प्रदेश – २१४ कोटी रु. प्रेनित कौर ( काँग्रेस) , पतियाळा , पंजाब – ३७ कोटी रु. सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) , राज्यसभा , महाराष्ट्र – २६.९ कोटी रु. प्रतिभा सिंग (काँग्रेस) , मंडी , हिमाचल प्रदेश – २२.६ कोटी रु. रेणुका चौधरी (काँग्रेस) , खम्माम , आंध्र प्रदेश – १४.२ कोटी रु. जयाप्रदा नहाटा (समाजवादी पार्टी) , रामपूर , उत्तर प्रदेश – ८.४ कोटी रु. मनेका गांधी (भाजप) , पिलिभिट , उत्तर प्रदेश – ६.६ कोटी रु. अनुराधा चौधरी (राष्ट्रीय लोक दल) , कैराना , उत्तर प्रदेश – ४.४ कोटी रु. डग्गुपती पुरंदरेश्वरी (काँग्रेस) , बापताळा , आंध्र प्रदेश – ३.८ कोटी रु. संगीता कुमारी सिंग देव (भाजप) , बोलंगीर , ओरिसा – २.७ कोटी रु.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: