हेमंत आठल्ये

राज्याच्या हितासाठी निर्दयपणे सत्ता राबवेन

In म. टा. खास on जून 23, 2009 at 6:15 pm

महाराष्ट्र टाइम्स : राज्य आणि प्रशासन यांच्यावर नियंत्रण नसलेल्या राजकारण्यांनी देशाची संपूर्ण वाट लावली आहे. माझ्याकडे राज्याची सत्ता आली तर, ती राज्याच्या हितासाठी निर्दयपणे राबवेन, अशी थेट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘स्टार माझा’च्या परिसंवादात मांडली. त्याचवेळी इतर राजकीय नेत्यांनी मात्र राज्याच्या विकास आणि समृद्धीचे मनोहारी रुप मांडत २०२० मधील राज्याचे चित्र रेखाटले.

परदेशात फिरताना खिन्नता येते आणि देशात परतलो इकडची स्थिती पाहून नैराश्य येते. फार दूर जायची गरज नाही. ब्रिटिशांनी बांधलेली कुलाबा ते माहिम ही मुंबई आणि आपण बांधलेली उपनगरे यात नियोजनाचा किती फरक जाणवतो, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि कायदा व सुव्यवस्था या सात विभागांवर सगळे लक्ष केंदीत करून विकासाचा शंभर वर्षांचा आराखडा तयार करायला पाहिजे, मनसेची अकादमी ते काम करीत असल्याचे ठाकरे म्हणाले.

‘माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र’ मांडताना संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी तंत्रज्ञान, संस्कृती आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याचे आवाहन केले. तर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी महाराष्ट्राने जगासमोर उदारमतवादी, सुसंस्कृत, ज्ञानी राज्याची प्रतिमा तयार करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तत्पूवीर्, राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी २०२० मधील राजकारणाचा वेध घेताना विकास आणि समृद्धीचे मनोहारी आणि आदर्श चित्र मांडले खरे मात्र, प्रत्यक्ष सत्ता राबवताना या गोष्टींचे भान का हरवते, त्याचे विवेचन केले नाही.

जातीच्या आधारावर नव्हे तर विकासाचे राजकारण हवे, असे खासदार गोपीनाथ मुंडे म्हणाले.

भावनेचा आधार नसावा, असे मत खासदार मनोहर जोशी यांनी मांडले. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठीचे ध्येय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील आणि केंदीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांच्या भाषणात मांडण्यात आली.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: