हेमंत आठल्ये

सानिया मिर्झा दरिद्र्य रेषेखाली

In बातमी, सकाळ on जून 25, 2009 at 4:49 pm

सकाळ – भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झाची आर्थिक परिस्थिती ‘हलाखी’ची असून, तिच्या नावाचा समावेश चक्क सरकारदफ्तरी ‘दारिद्रयरेषेखालील’ कुटुंबात करण्यात आला आहे. तसेच गरीबांसाठी तयार करण्यात आलेल्या रेशनकार्डातही तिचे नाव नोंदविण्यात आले असून, त्या नावाचा चक्‍क फोटोपासही असल्याचे आढळून आले आहे.
हे तर काहीच नाही, याशिवाय तिचे लग्नही झाले असून, एक वीसवर्षीय तरुण तिचा नवरा असल्याचे या कागदपत्रांत नमूद करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकारी कारभारावर पुनश्‍च प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे.
ही घटना घडलीये आंध्र प्रदेशातील विझिनगरम जिल्ह्यातील वेपाडू नामक खेडेगावात. देशातील सर्वांत श्रीमंत खेळाडू असणाऱ्या मोजक्‍या खेळाडूंमध्ये सानियाचा समावेश असताना, हा प्रकार उघडकीला आल्यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा प्रकार कानी पडताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखररेड्डी यांनी संतप्त होउन हे रेशनकार्ड जारी करणाऱ्या अधिकाऱ्याचा तपास करण्याचा आदेश दिला आहे.
प्रशासनाने सानियाच्या पतीचे नाव श्री. नारायण असल्याचा जावईशोधही लावला आहे. नवरा हिंदू आणि बायको मुस्लीम असल्याचा अजब प्रकारही आढळून आला आहे. याशिवाय गरीबांना देण्यात येणारा स्वस्तातील गहू आणि तांदूळ या दांपत्यास देण्यात यावा असा शेराही त्यात मांडण्यात आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने या घटनेचा खुलासा केला असून, संपूर्ण राज्यात सुमारे 45 लाख बोगस रेशनकार्डांचे वाटप झाल्याचाही संशय व्यक्त केला आहे.
यापूर्वीही पुण्यात असाच एक प्रकार घडला होता, त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे बनावट रेशनकार्ड तयार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच, सानिया मिर्झाच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: