हेमंत आठल्ये

गुगलच्या ‘वेव्ह’वर स्वार होणार?

In म. टा. खास on जून 28, 2009 at 4:34 pm

म. टा. खास – सध्या गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये साप-मुंगुसाचा खेळ सुरू आहे. हे दोघे जानी दुश्मन इंटरनेटच्या मैदानात एकमेकांना धोबीपछाड करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. गुगल सर्चचं बिंग फोडण्यासाठी मायक्रोसॉफ्टने ‘एमएसन बिंग’चे प्यादे पुढे केले. पण हे बिंग लोकापर्यंत पोहचण्याआधीच गुगलने आपल्या ऑल इन वन ‘गुगल वेव्ह’ या भन्नाट वेब प्लॅटफॉर्मची घोषणा केली. इंटरनेटच्या दुनियेतील या चढाओढीचा फायदा शेवटी नेटयुझर्सनाच होणार असून आपण तरी त्यासाठी सज्ज असायला हवं… 

गुगल वेव्हमध्ये काय आहे… याचे एका वाक्यात उत्तर द्यायचं तर गुगल नावाने इंटरनेटच्या जगात जे जे उपलब्ध आहे ते ते सारे या वेव्हमध्ये एकत्र असेले. यात सर्च आहे, ई-मेल आहे, मेसेजिंग आहे, चॅट आहे, फोटो शेअरिंग आहे, गुगल मॅप आहे, गेमिंग आहे आणि… खूप काही आहे. एवढेच नाही तर यात आणखी अनेक गोष्टी अॅड करण्याची सुविधाही असेल. त्यामुळे गुगलच्या या नव्या अवतारात त्याचे काय रूप दिसणार आहे याकडे इंटरनेटकर डोळे विस्फारून बसले आहेत. 

रिअल टाइम ऑपरेशन हे या वेव्हचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामुळे एखाद्याशी चॅट करत असताना समोरचा लिहित असलेले प्रत्येक अक्षर आपल्या कम्प्युटरवर दिसू शकेल. आपल्या एखाद्या ब्लॉगशी किंवा वेबसाइटसोबत आपण आपले गुगल वेव्ह अकाउण्ट वापरू शकू. त्याचप्रमाणे हे गुगलवेव्ह विकिपीडियासारखे ओपन सोर्स एन्सायक्लोपिडियासारखे काम करेल. त्यामुळे एखादा मजकूर अनेक एक्सपर्टकडून एडिट होऊ शकतो. अशी एकापेक्षा एक अॅप्लिकेशन्स एकाच वेळी खांद्यावर वागवणारे ही वेव्ह इंटरनेटमध्ये नवी क्रांती घेऊन येत आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. 

समजा आपल्याला एखाद्यासोबत फाइल शेअर करायची आहे, तर ई-मेल अटॅचमेण्ट पाठवणं गुगलटॉकमुळे आताच आउटडेटेड ठरलं आहे. पण गुगलवेव्हमुळे तर ते कॉमन होणार आहे. कारण अटॅचमेण्ट पाठवण्यापेक्षा गुगलवेव्हमध्ये फक्त ड्रॅग अॅण्ड ड्रॉप करून फाइल समोरच्याच्या इंटरअॅक्शन बॉक्समध्ये टाकले की, काम फत्ते… फाइल ट्रान्सफरचा याहून सोपा उपाय सध्यातरी दुसरा कोणता नाही. 

एकंदरीत काय? तर गुगल आपली सर्व शस्त्रं एकत्र करून या नव्या ब्रह्मास्त्रासह नेट-इन होण्याची तयारी करतेय. यात फक्त गुगलचीच अॅप्लिकेशन नाहीत, तर इतर वेबसाइटचीही अॅप्लिकेशन यात वापरता येणार आहेत. तसंच गुगलच्या अॅप्समध्ये नियमित लागणारे शोधही इथे थेट वापरता येतील. त्यामुळे नेटयुझरला एखाद्या पंचपंक्वान्नांनी भरलेल्या ताटावर बसल्याचा फिल येणार आहे. त्यामुळे कुठून सुरुवात करायची आणि कायकाय खायचं हे ठरवणंही अवघड होणार आहे. त्यामुळे सज्ज राहा आणि अवघ्या काही महिन्यांची वाट पाहा.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: