हेमंत आठल्ये

१६ ऑगस्टला ‘गे प्राइड’ मिरवणूक

In म. टा. खास on जून 30, 2009 at 6:54 सकाळी

म. टा. खास– भारतीय दंड विधानाचे कलम ३७७ पूर्णपणे ‘रद्दबातल’ करण्यात यावे, अशी समलिंगी समुदायाची मागणीच नसून दिल्ली हायकोर्टासमोरील याचिका ही ‘कलम दुरुस्ती’साठी आहे. समलिंगी संभोग नैसगिर्क प्रवृत्तीविरोधी असल्याचे प्रतिपादन करीत या ‘गुन्ह्या’साठी १० वर्षांपर्र्यंतच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या या कलमातील बाल लैंगिक शोषणासंदर्भातील उल्लेख कायम ठेवून, परस्पर संमतीच्या प्रौढ समलिंगी संबंधांना कलमातून वगळण्यात यावे, अशीच मागणी समलिंगींची आहे, याकडे पुण्यातील ‘समपथिक ट्रस्ट’चे बिंदुमाधव खिरे यांनी लक्ष वेधले आहे.

संबंधित ब्रिटिशकालीन कलम रद्दबातल करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू असल्याचे कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी शनिवारी सूचित केल्यापासून यासंबंधातील चर्चा प्रसारमाध्यमांत सुरू झाली.

गृहमंत्री चिदंबरम यांनी कलम ३७७ रद्दबातल करण्यासंदर्भातील बैठक लवकरच बोलावली असून कायदामंत्री, आरोग्यमंत्री आणि सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना बोलावले आहे, असे मोईलींनी शनिवारी सांगितल्यानंतर दिल्ली, चेन्नई आणि बंगलोरच्या ‘गे प्राइड’ मिरवणुकांत रविवारी आनंद व्यक्त करण्यात आला. खिरे यांनीही, समाजामध्ये यासंबंधात मोकळेपणा आलेला असताना आणि सरकार बहुमतात असताना आता हा मुद्दा मागे पडणार नाही, असे मत व्यक्त केले. मोईलींच्या बदललेल्या पवित्र्याबद्दल बोलतानाही, धामिर्क नेत्यांकडून विरोध होणारच. अशी अपेक्षा खिरेंनी व्यक्त केली. खिरे सॉफ्टवेअर प्रोफेशनल असून समपथिक ट्रस्ट समलिंगींकरिता काम करते.

दिल्ली हायकोर्टात २००१ साली दाखल याचिकेवर आता निकाल अपेक्षित आहे. कोर्टासमोर केंदीय गृहखात्याने ‘हे आपल्या संस्कृतीत बसणारे नाही. कलम रद्द केल्यास प्रवृत्ती बोकाळेल’, असा सूर लावला. तर आरोग्यखात्याने एचआयव्ही नियंत्रणाला कलम मारक ठरत असल्याची भूमिका घेतली, याकडेही खिरे लक्ष वेधतात. आता मात्र, चिदंबरम आणि मोइली दोघेही अनुकूल असल्याने सरकार कृती करू शकेल, असा विश्वास समलिंगींना वाटतो.

१६ ऑगस्टला ‘गे प्राइड’ मिरवणूक

मुंबईत गेल्या वर्षी ‘गे प्राइड’ मिरवणुकीत सातआठशे लोक सहभागी झाले होते. यंदा हा आकडा दोन हजारांवर जाईल. १६ ऑगस्टला मुंबईतली गे प्राइड मिरवणूक निघेल.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: