हेमंत आठल्ये

सागरात ‘मराठी’ अस्मिता बुडालीः ठाकरे

In म. टा. खास on जुलै 2, 2009 at 6:13 pm

म. टा. खास – वांद्रे वरळी सी-लिंकला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडून करण्यात  आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यावर तोफ डागली आहे, बारामतीकरांनी अशी भूमिका घेऊन वांद्रे-वरळीच्या सागरात ‘ मराठी अस्मिता बुडावली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात बाळासाहेबांनी ही टीका केली आहे. राज्याराज्यांत शासकीय प्रकल्पांनाही नेहरू-गांधी खानदानांची नावे आहेत. जणू देशाचा सातबारा यांच्याच नावाने केलाय, अशी तोफही बाळासाहेबांनी डागली आहे.

हिंदुस्थान म्हणजे तुमच्या नेहरू-गांधी खानदानाची जागीर आहे काय असा प्रश्न या देशातील जनतेला नक्कीच पडत असेल. मध्यंतरी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक भन्नाट घोषणा केली होती. ती म्हणजे , ‘ या देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा! ‘ यावर थोडेफार वादळ उठले. पण अशा वादळांना विचारतेय कोण मनमोहन सिंगांच्या हिरव्या घोषणेत बदल करावा असे आम्हाला वाटते. मनमोहन सिंग म्हणतात त्याप्रमाणे या देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा असेलही. कारण हिंदूंना इकडे विचारतेय कोण पण या देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क कुणाचा असेल तर तो फक्त नेहरू-गांधी खानदानाचा,मुसलमानांचा हक्क नंतर, असेही त्यांनी यात म्हटले आहे. 

नेहरू-गांधी खानदानामुळेच मुसलमानांचा अतिरेकी उदो उदो आमच्या देशात सुरू झाला व जोपर्यंत हे खानदान दिल्लीच्या गादीवर आहे तोपर्यंत हा ‘ उदे गं उदे अल्ला मियाँ ‘ सुरूच राहणार आहे. कुठे काही नवे प्रकल्प किंवा योजनांची सुरुवात झाली की त्यास नेहरू-गांधी परिवारातील एखाद्याचे नाव द्यायचे असा जणू राजकीय कूळकायदाच ठरवलेला आहे, अशीही टीका यात करण्यात आली आहे. 

शरद पवारांनी येथेही लाचारीची करामत करीत जाहीर केले की , ‘ वांद्रे-वरळी सागरी पुलास स्वर्गीय राजीव गांधींचे नाव द्यावे. ‘ पवारांच्या सूचनेस मान्यता देऊन मुख्यमंत्री वगैरे लोकांनी त्यास मंजुरी दिली. हे सर्व नाटक आधीच ठरले होते. सोनिया गांधींना खूश करण्यासाठी मी लाचार ‘ रागाची आळवणी करतो. मुख्यमंत्र्यांनी त्या लाचार रागाची री ओढत ‘ व्वा! वाहवा! क्या बात है ‘ म्हणायचे. मराठी जनता हे न समजण्याइतकी दुधखुळी नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेसवाल्यांना सावरकरांच्या नावाचे वावडे आहे मग महाराष्ट्रातील इतर नररत्नांचे काय ?ऊठसूट डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांचे नाव घेता ना मग या भव्य सागरी मार्गास फुले-आंबेडकरांचे तरी नाव का बरे दिले नाही फुले-आंबेडकरांपेक्षा राजीवचा त्याग व कार्य महान होते काय त्याचा खुलासा शरद पवार यांनी केला तर बरे होईल. मतांसाठी फुले- आंबेडकर व फायद्यासाठी नेहरू-गांधी. हे ढोंग आहे. फसवणूक आहे. या सागरी मार्गास फुले-आंबेडकरांचे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याची संधी लाचार वृत्तीने दवडली आहे. एक स्पष्ट झाले काँग्रेजी बगलबच्च्यांना सावरकर फुले व आंबेडकरांचे नाव घेणे कमीपणाचे वाटते. 

दिल्लीतील ९० टक्के शासकीय व सामाजिक संस्थांना नेहरू-गांधी खानदानांचीच नावे आहेत. राज्याराज्यांत शासकीय प्रकल्पांनाही याच खानदानांची नावे. जणू देशाचा सातबारा यांच्याच नावाने केलाय. या देशात दुसरे कुणी जन्मालाच आले नाही. महाराष्ट्रातही तेच घडणार असेल तर उद्या रायगडासही गांधी-नेहरूंचे नाव देण्याची सूचना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नकली मरगट्टयांनी करावी. मराठी माणसा जागा राहा. या नतद्रष्ट अवलादीपासून सावध राहा सावध राहा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: