हेमंत आठल्ये

अनर्थ संकल्प

In मी on जुलै 7, 2009 at 5:28 pm

कालच आपल्या देशाचा अर्थ संकल्प सादर झाला. आता त्यात काय हवे आणि काय नको, हे संगण्या इतपत मी शहाना नाही. बर्‍याच वृत्तपत्रांच्या मते हा अर्थ संकल्प ना चांगला ना वाईट. प्रणव साहेबांनी केलेल्या कथ्याकुतिला मी अपमान करणार नाही. पण मला हे काळत नाही की आपली देशाची परिस्थिती नसताना, आपण नेहमी एवढा खर्च का करतो?. मला फक़त असे म्हणायचे आहे की आपण कोणताच खर्च काही हजार कोटीत का करतो?. साधा पूल जरी बांधायचा असेल तरी काही शे कोटी.

रस्ता प्रकल्प, पुन्हा 2 – 4 हजार कोटी. आणि याचा असा काय फायदा होतो?. संसद भवनाचा मिनिटाचा खर्च काही लक्ष रुपये. प्रतिभाताई पाटील (आपल्या राष्ट्रपती) यांच्या घरचा (राष्ट्रपती भवनाचा) खर्च काही कोटी रुपये (प्रती वर्षी). आणि बाईसाहेब, कधीही बघा फिरतीवर. मध्यंतरी अहमदाबदला हल्ला झाला, बाई कुठे तर परदेशात. बर मीडियाला त्यानी कार्यक्रम स्थगित करून आलेल्याचे कौतुक. मुंबईला हल्ला झाला. बाई पुन्हा बाहेरच. बर जाण्याचे काही नाही. पण काय ती स्वतच्या पैश्याने जाते का ते नाही. बर ते सोडा. महानगरपालिकेचे नगरसेवकाना आजकाल परदेशदौरा आवश्यक वाटतो. काय तर म्हणे अभ्यास करायला जातात. मग सहकुटुंबाची काय गरज?. मग हे देखील सरकारी खर्चाने.

पंतप्रधान, मंत्री, लोकप्रतिनिधी, हे नेहमी आभास दौर्यासाठी अमेरिकेत वगैरे जातात. पण मग आपल्याला त्याचा फायदा काय? आपल्या इथे रस्त्यात खड्डे, वीज आहे की नाही ते कळायला मार्ग नाही. पाण्याची बोंब. मग काय उपयोग त्या अभ्यासाचा. कदिहि बघा रस्त्यावर गर्दीच गर्दी. रेल्वे काय भीकार्‍यासाठी आहे का ते कळतच नाही. नेहमी त्याना प्रवासात सूट, आणि आम्ही, तिकीट काढून धक्के खायचे. घरपट्टी भरा, विजबील भरा, कर भरा तो पण काही साधा सुधा नव्हे 10 – 20%. अरे, काय बापची जहागिरी आहे काय?. पैसे कमवायाचे आपण, आणि त्यावर मस्ती मारायची प्रतिभा, मनमोहन आणि आडवणिनी. बर हे आजी आजोबा देशासाठी काय करतात म्हणाव तर काही नाही. दिवाळीत फटाके उडावे तसे देशात बॉम्ब ने लोकांचे अवयव उडत आहेत.

आपल्या देशाची सैन्यादलाचे एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास ‘दुय्यम दर्जाच्या साधानानी लढणारे प्रथम दर्जाचे सैन्य’ असे करता येइल. ‘जाउ द्या आपल्याला काय त्याच’ अस म्हणण्याच्या वृत्तीने हे आजी आजोबा आपल्या देशाला खाड्यात टाकल्या वाचून राहणार नाहीत. या करता शक्य ते प्रयत्न करा. कारण आपणच या देशाचे भवितव्य आहोत. सोनियचा काळ असला तरी आणि मनमोहन वाटले तरी, आपणा शिवाय या देशाला कोणीही पुढे नेऊ शकत नाही. सगळ काही सरकारवर सोडून चालणार नाही. आता काय करायला हव हे सांगायला आपण काही लहान बाळ नाही.

  1. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? राजकारण, राजकारणी, खर्च की अर्थसंकल्प?
    अर्थात्‌ हे सगळं मिळून एक मोठ्ठा प्रॉब्लेम होतो, हे हि खरं!

    बाकी जरा तेवढं शुद्धलेखन बघा बुवा!
    धन्यवाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: