हेमंत आठल्ये

‘टाइम्स ऑफ इंडिया’ वेबसाइट सर्वोत्तम

In बातमी, म. टा. खास, संगणक on जुलै 13, 2009 at 4:51 pm

म. टा. खास– फास्ट अपडेट देण्यासाठी प्रसिद्ध असलेली http://www.timesofindia.com ही टाइम्स समुहाची इंग्रजी वेबसाइट सर्वाधिक पेज व्ह्यूज मिळवून जगात सर्वोत्तम ठरली आहे . इंटरनेटच्याक्षेत्रात मार्केटिंगसाठी संशोधन करणा या कॉमस्कोअर (ComScore) या आंतरराष्ट्रीयकंपनीच्या आकडेवारीनुसार , टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटने यंदाच्या मे महिन्यात १५कोटी ९० लाख पेज व्ह्यूज मिळवले आहेत .

न्यूयॉर्क टाइम्स , सन , वॉशिंग्टन पोस्ट , डेली मेल आणि युएसए टुडे या प्रसिद्ध इंग्रजी वेबसाइटच्या तुलनेत टाइम्स ऑफ इंडियाची वेबसाइट खूपच पुढे आहे . वेबसाइटच्यापेजव्ह्यूजच्या आकडेवारीची नोंद ठेवणा या अतिशय विश्वसनीय अशा कॉमस्कोअर(ComScore) या आंतरराष्ट्रीय कंपनीने सर्वाधिक पेज व्ह्यूज मिळवणा या पाच वेबसाइटचीयादी प्रसिद्ध केली आहे . या यादीतील आकडेवारीनुसार , timesofindia.com या वेबसाइटनेयंदाच्या मे महिन्यात १५ कोटी ५९० लाख पेज व्ह्यूज मिळवले . याच काळात thesun.co.ukया वेबसाइटने १४ कोटी २० लाख , nytimes.com या वेबसाइटने १२ कोटी ४० लाख , dailymail.co.uk या वेबसाइटने ७ कोटी ३० लाख आणि washingtonpost.com यावेबसाइटने ६ कोटी १० लाख पेज व्ह्यूज मिळवले आहेत .

टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटने मिळवलेल्या या यशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतानाटाइम्स समुहाचे एम डी विनित जैन म्हणाले , इंटरनेट युझरना माहिती हवी असते , त्यांनाबातम्या वाचायला खूप आवडते आणि त्यांना आम्ही बातम्यांच्या स्वरुपात खूप चांगलीआणि महत्त्वाची माहिती पुरवतो युझरना आम्ही दिलेल्या बातम्या वाचून आनंद मिळतो .पण अजून खूप काही करायचे आहे . भारतात फक्त ५ टक्के नागरिकांपर्यंतच इंटरनेटचापुरेपूर वापर करतात . इंटरनेटचे फायदे कळू लागल्यामुळे हे प्रमाण दरवर्षी ३० टक्के याप्रमाणात वाढत आहे , त्यामुळे आगामी काळात आम्ही खूप नवे प्रयोग करणार आहोत .या प्रयोगांमुळे timesofindia.com च्या रिडरच्या संख्येत भरपूर वाढ होईल , असा विश्वासत्यांनी व्यक्त केला . टाइम्स ऑफ इंडियाची वेबसाइटची इंटरनेटच्या जगातली अतिशयमहत्त्वाची वेबसाइट म्हणून पुढे येत आहे , असेही त्यांनी सांगतले .

टाइम्स ऑफ इंडिया हे जगातील सर्वाधिक खपाचे ब्रॉडशीट इंग्रजी वृत्तपत्र आहे . यावृत्तपत्राची आधुनिक स्वरुपातील आवृत्ती म्हणजे timesofindia.com ही वेबसाइट आहे .उल्लेखनीय बाब म्हणजे timesofindia.com या वेबसाइटचे ६५ टक्के वाचक हे भारताबाहेरराहणारे इंटरनेट युझर आहेत . त्यामुळे TOI एक ग्लोबल ब्रँड च्या स्वरुपात पुढे येत आहे .

टाइम्स ऑफ इंडियाची वेबसाइट ही फक्त जगातील नंबर वन वेबसाइट नाही तर प्रचंड वेगवान वेबसाइट आहे . टाइम्स समुहाच्या timesofindia.com या वेबसाइटवर सर्वाधिककाळ वाचन करणे युझरना आवडेत . युझर साधारणपणे ५ . २ मिनिटे timesofindia.comया वेबसाइटवर थांबतो . त्या तुलनेत NYT च्या साइटवर फक्त २ . ८ मिनिटेच थांबतो ,असेही कॉमस्कोअर (ComScore) आकडेवारीतून स्पष्ट होते. ही आकडेवारी विशिष्ट सायबरकॅफेंच्या माध्यमातून नाही तर थेट इंटरनेटचा उपयोग करुन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरुन वेबसाइटला मिळणा-या प्रत्येक पेजव्ह्यूज ची नोंद ठेवून करण्यात येते आणि अशा प्रकारे जगातील लाखो वेबसाइटच्या पेजव्ह्यूजची नोंद ठेवण्यात येते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: