हेमंत आठल्ये

निळू फुले यांची कारकीर्द

In बातमी, म. टा. खास on जुलै 13, 2009 at 5:02 pm

म. टा. खासनिळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला . त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकूनमिळणा या पैशांवर चरितार्थ चालवत होते . फुले मॅट्रीक पर्यंतच शिकले . पण त्यांनाअभिनयाची प्रचंड आवड होती . आपली अभिनय करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः १९५७ मध्ये येरा गबाळ्याचे काम नोहे हा वग लिहिला . त्यानंतर पु . ल . देशपांडेयांच्या नाटकात रोंगे ची भूमिका साकरुन त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले . मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते ख या अर्थाने कलाकारम्हणून पुढे आले .

नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला . नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणा या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचेनिरीक्षण अतिशय अचूक होते . या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खूबीने उपयोग केला .सहज सुंदर अभिनय करणा या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला .

नायक म्हणून निळू फुले जितके लोकप्रिय झाले त्यापेक्षा जास्त ते खलनायक म्हणूनलक्षात राहिले . त्यांनी नाटकातच नाही तर सिनेमातही आपल्या अभिनयाची छाप पाडली .अनेक मराठी आणि हिंदी सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत . त्यापैकी एकगाव बारा भानगडी , सामना , पिंजरा , सिंहासन , पांढर या सिनेमांतील त्यांच्या भूमिकाविशेष गाजल्या . अलिकडेच्या त्यांनी गाव तसं चांगलं या मराठी सिनेमात भूमिका केलीहोती . त्यांची सखाराम बाईंडर नाटकातील सखारामाची भूमिका आणि सूर्यास्त यानाटकातील अप्पाजीची भूमिकाही खूप गाजली होती . त्यांनी अनेक हिंदी सिनेमे केले .त्यापैकी कुली , गुमनाम है कोई , जरा सी जिंदगानी , रामनगरी , नागिन २ यातत्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या .

अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारने तीन वेळा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देऊनगौरविले . संगीत नाटक अकादमी , अनंतराव भालेराव पुरस्कार आदी पुरस्कारही त्यांनामिळाले होते .

नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचाकार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली . त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठीही बरेच काम केले .सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी १९५८ च्या सुमारासपुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले .
निळू फुले यांची गाजलेली नाटकं 
सूर्यास्त , सखाराम बाईंडर , जंगली कबूतर , बेबी , रण दोघांचे

निळू फुले यांची गाजलेली लोकनाट्यं 
पुढारी पाहिजे , बिन बियाचे झाड , कुणाचा कुणाला मेळ नाही , कथा अकलेच्या कांद्याची ,लवंगी मिरची कोल्हापूरची , मी लाडाची मैना तुमची , राजकारण गेलं चुलीत

निळू फुले यांचे गाजलेले मराठी सिनेमे 
एक गाव बारा भानगडी , सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण, नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , सिंहासन , रानपाखर ,मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई ,लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक ,बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळचौकडी , सर्वसाक्षी , आयत्या बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , पैजेचा विडा ,जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत ,आई ( नवीन ), लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली ,शापित , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , राणीने डाव जिंकला , जगावेगळीप्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब , आघात , रिक्षावाली , कळत नकळत ,मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप, सेनानी साने गुरूजी , पुत्रवती

निळू फुले यांचे गाजलेले हिंदी सिनेमे 
कुली , सारांश , जुगलबंदी , जरासी जिंदगी , गुमनाम है कोई , रामनगरी , नागिन ( २ )भयानक , घर बाजार , दिशा , गरिबों का दाता , उँच नीच बीच , औरत तेरी कहानी , मोहरे, कब्जा , हिरासत , जागो हुआ सवेरा , सूत्रधार , इन्साफ की आवाज , कॉंच की दीवार ,मशाल , सौ दिन सास के , दो लडके दोनो कडके , कानून का शिकार , मेरी बिबी की शादी ,दुनिया , जख्मी शेर , वो सात दिन , नरम गरम

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: