हेमंत आठल्ये

डॉक्टरांचा संप अखेर मागे; ७ हजारांची वाढ

In बातमी, म. टा. खास on जुलै 14, 2009 at 10:24 pm

म. टा. खास – विद्यावेतनामध्ये सात हजार रुपयांची वाढ पदरात पाडून घेतल्यानंतर आज अखेर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला संप मागे घेतला. २००७ पासूनची थकबाकीही डॉक्टरांना मिळणार असून त्यांच्यावरील आतापर्यंतची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

विद्यावेतनवाढीसह अन्य ११ मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. गेल्या मंगळवारपासून राज्यातील १४ महाविद्यालयातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांपैकी ३१४८ डॉक्टर संपावर गेले होते. परिणामी आठवडाभरापासून रुग्णांचे प्रचंड हाल सुरु होते. विशेषतः पालिका व सरकारी हॉस्पिटलमधील रुग्णसेवा पार कोलमडली होती. संपकरी डॉक्टरांची पदव्युत्तर पदवीची नोंदणी रद्द केल्यानंतर तसेच कामावरुन काढून टाकल्यानंतरही डॉक्टरांचा संप सुरुच होता.

आज अखेर आठव्या दिवशी संपकरी डॉक्टर्स आणि राज्य सरकार यांच्यात तडजोड झाली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विद्यावेतन ७ हजार रुपयांनी वाढवून देण्याचे सरकारने मान्य केले. त्याचप्रमाणे डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई देखील मागे घेतली. टोपे यांनी दिलेला हा प्रस्ताव मार्डने मान्य केला आणि संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आता ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टरना २२ हजार ७०० रुपये, सिनीअर रेसिडेंट डॉक्टरना २३ हजार ३३ रुपये आणि चीफ रेसिडेंट डॉक्टरना २३ हजार ७०० रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे. एवढेचन नव्हे तर २००७ पासूनची थकबाकीही संपकरी डॉक्टरांना मिळणार आहे.

त्याशिवाय संवेदनशील हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यकतेप्रमाणे ३ बंदुकधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. महिला निवासी डॉक्टरांना मॅटर्निटी रजा देण्यासही सरकारने मंजुरी दर्शवली असून, पुढील तीन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर डॉक्टरांचा विमा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मार्डचे सेक्रेटरी डॉ. अनिल दुधभाते यांनी दिली.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: