हेमंत आठल्ये

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची भीती

In बातमी, म. टा. खास on जुलै 15, 2009 at 11:07 सकाळी

म. टा. खास – गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची भीती मुंबईकरांच्या मनात कायम असताना आता दोन वर्षातील सर्वात भीषण मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या नवीन धोक्याचा सामना करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

गुप्तचर खात्यानी दिलेल्या इशा-यानुसार महाराष्ट्रातील सात ठिकाणी पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. यात मुंबईतील काही बँक, मुंबई आणि नवी मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. आठ जुलैला देण्यात आलेल्या या अलर्टमध्ये या सात ठिकाणांचे छायाचित्रही देण्यात आली आहेत.

खवळलेला समुद्र आणि खराब हवामान असतानाही समुद्रमार्गे येवून पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. मात्र, या संदर्भात त्यांनी आणखी तपशील दिला नाही. मात्र, गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सात ठिकाणांना लक्ष्य करून गेल्या दोन वर्षातील भीषण हल्ले घडवण्याची दहशतवाद्यांची योजना आहे. यामुळे किनारपट्टीच्या भागात सुरक्षा यंत्रणांनी गस्त वाढवली आहे.

जम्मू आणि काश्मिरात एका अतिरेक्याला पकडल्यानंतर त्याच्याकडून ही माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी या अतिरेक्याकडून मुंबईतील या सात ठिकाणांचे छायाचित्र हस्तगत केली. महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना हे छायाचित्र इ-मेलद्वारे पाठवण्यात आले आहेत.

हे छायाचित्र खरे असून यात मुंबई हायकोर्टाजवळील एका नामवंत बँकेचे कार्यालय, मुंबईतील दोन तर नवी मुंबईतील एक रेल्वे स्टेशनचा समावशे आहे. यातील नवी मुंबईतील स्टेशनला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली नसल्याचेही या सुत्राने सांगितले.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: