हेमंत आठल्ये

पक्ष गेला खड्ड्यात

In म. टा. खास on जुलै 16, 2009 at 12:21 pm

म. टा. खास – दमदाटी, धमक्या, असंबद्ध वाक्ये, शिवराळ आणि गुमीर्ची बेबंद भाषा या गोष्टींचे पुरेपूर दर्शन घडवत साताऱ्याचे खासदार उदयन राजे यांनी पत्रकार परिषद गाजवली. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातफेर् ते निवडून आले त्याबद्दल ‘खड्ड्यात गेला पक्ष’ अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला. पोलिस खातेही यामधून सुटले नाही. वृत्तवाहिन्यांवर आज दिवसभर उदयनराजे यांच्या पत्रकार परिषदेची दृष्ये दाखवली जात होती. याला निमित्त घडले ते वकिलांचा मोर्चा आणि त्यांनी केलेली राजे प्रतिष्ठानची नोंदणी रद्द करण्याची मागणी.

सातारा येथील एक वकील अॅड्. विक्रम पवार यांच्या घरात शनिवारी घुसून त्यांना राजे प्रतिष्ठानच्या कार्यर्कत्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ सातारा येथील वकिलांनी सोमवारी ‘काम बंद ‘ आंदोलन करून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता.

मारहाणीच्या निषेधार्थ राजे प्रतिष्ठानची नोंदणी रद्द करावी आणि मारहाणीच्या प्रकरणातील संशयितांना तातडीने अटक केली जावी, अशाही दोन मागण्या वकिलांच्या आहेत. मोर्च्यानंतर मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी विकास देशमुख आणि सातारा जिल्हा पोलिस प्रमुख विठ्ठल जाधव यांना देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर उदयन राजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली.

काळ्या टीशर्ट मध्ये पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आलेल्या उदयन राजे यांनी राजे प्रतिष्ठानची नोंदणी रद्द करण्याची वकिलांनी केलेली मागणी निंदनीय आहे, ही नोंदणी रद्द झाल्यास जिल्ह््यात उदेक होईल आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असे सुनावले.

‘पक्ष गेला खड्ड्यात’ असे सांगत, आपण भ्रष्टाचारी नाही , कुणापुढे हात पसरत नाही म्हणून आपल्याला संपवण्याचा घाट घातला जात आहे. पण आपण संपणार नाही. आपल्याविरुद्ध कुंभाड रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपण २२ महिने तुरुंगात होतो, तेव्हा कोणत्या वकिलाला हात लावल्याची घटना घडली नाही. विमानात वकिलांनी एका एअर होस्टेसची छेडछाड केली तेव्हा या वकिलांनी त्याचा निषेध केला का? वकिलांनी काहीही करावे आणि आम्ही ते चालवून घ्यावे हे चालणार नाही, असेही त्यांनी सुनावले.

बहिणीचे संरक्षण करायला गेलेल्या भावावर हात उचलला जातो, पोलिसांना आई बहिण नाही का, की गहाण ठेवल्या आहेत? अशा सवाल करणाऱ्या उदयनराजेंची पत्रकार परिषदेमधील विविध दृष्ये वृत्तवाहिन्यांवर पुन्हा पुन्हा दाखवले जात होती. पोलिसांनी या प्रकरणात आपली आणि आपल्या माणसांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. राजे प्रतिष्ठानच्या कार्यर्कत्यांचा वकील मारहाणीप्रकरणी कसलाही संबंध नाही, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप मोझर व इतरांवरील गुन्हा काढून टाकावा, अशी मागणी प्रतिष्ठानने एका निवेदनाद्वारे केली.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: