हेमंत आठल्ये

पुण्यात कार चेसिंगचे थरारनाट्य

In म. टा. खास on जुलै 19, 2009 at 9:49 pm

म. टा. खास – पुण्यातील कॅम्प परिसरातील नागरिकांनी आज हिंदी चित्रपटात शोभावे, असे कार चेसिंगचे थरारनाट्य अनुभवले. भरधाव वेगाने पळणा-या कारच्या बॉनेटवर ट्रॅफिक पोलिस लटकत आहे आणि कारचालकाला रोखण्यासाठी पोलिस उपायुक्त कारवर फायरिंग करत आहे, असे दृश्य दिवसाढवळ्या पुणेकरांना पाहायला मिळाले. वाहतुकीने नियम तोडून पळणा-या कमल जैन या कारचालकाला पोलिसांनी अटक केली असून, या थरारक चेसिंगच्या घटनेत शौर्य दाखवणारे ट्रॅफिकचे सहायक फौजदार वाल्मिक जाधव आणि पोलिस उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांना शौर्यपदक देण्याची घोषणा पोलिस महासंचालकांनी केली आहे.

आज सकाळी साडे अकरा वाजता कॅम्प परिसरातील वेस्टएंड सिनेमा थिएटरजवळ हा थरारक प्रसंग घडला. कमल जैन (वय ६५, रा. कोंढवा) नावाचा एक एनआयआर वेस्टएंड मध्ये खरेदीसाठी गेला होता. त्याने आपली फोर्ड आयकॉन कार रस्त्यावरच उभी केली होती. वाहतूक शाखेचे सहायक फौजदार वाल्मिक जाधव त्या कारला जामर लावायला गेले. तेव्हा धावत आलेला जैन आणि जाधव यांची बाचाबाची झाली. जाधव जामर लावण्यासाठी कारच्या पुढच्या बाजूने गेले असता, जैनने कार सुरु करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. जाधव यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु जैनने कार भरधाव सुरु केली. त्यामुळे बॉनेटवर पडलेल्या जाधव यांनी व्हायपरला घट्ट धरुन ठेवले.

कारच्या बॉनेटवर ट्रॅफिक पोलिस लटकत होता आणि ही कार रस्त्यावरुन भरधाव पळत होती. या दरम्यान कारची रस्त्यावरुन जाणा-या तीन मोटार सायकलींनाही धडक बसली. योगायोगाने पोलिस उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी हा प्रकार पाहिला. ट्रॅफिक पोलिसाचा जीव धोक्यात असल्याचे पाहून त्यांनी पाठलाग सुरु केला. तीन तोफा चौकामध्ये ही कार आली असता, सेनगावकर यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून धावत्या कारवर फायरिंग सुरु केले. त्यांनी कारवर सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या लागून टायर फुटला व अखेर कारचालक कमल जैन याने कार थांबवली. जैनला अटक केल्यानंतर तब्बल पंधरा-वीस मिनिटे सुरु असलेले हे थरारनाट्य संपले.

कमल जैन हा एनआरआय असून, सध्या टाटा टेलिकॉममध्ये कन्स्ल्टंट म्हणून काम करत आहे. या घटनेत मोटार सायकलवरुन जाणारे सतीश खानविलकर (वय ४२) आणि पत्नी निलीमा (वय ४०) हे जोडपेही जखमी झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: