हेमंत आठल्ये

‘ईव्हीएम’ मे कुछ भी हो सकता है..

In बातमी, सकाळ on जुलै 20, 2009 at 12:26 सकाळी

सकाळ– एका डमी उमेदवाराच्या नावासमोरची कळ बारा मतदारांनी दाबली. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? त्याला बाराच मते मिळणार; परंतु नाही त्या उमेदवाराला मिळाली फक्त सहा मते. एवढेच नव्हे तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला पाच जणांनी मतदान केले; मात्र त्याला चक्क 14 मते मिळाली आणि तो विजयी झाला. ही अजब किमया आज टिळक पत्रकार सभागृहात बघायला मिळाली. या प्रकारामुळे इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्होटिंग मशिनचा फोलपणा आपसूकच उघड पडला. अनेक शंकाचे यावेळी निरसन करण्यात आले. परंतु, काही प्रश्‍न अनुत्तरित राहिलीत. शेवटी निवडणुकीत कुछ भी हो सकता है…हेच खरे ठरले.


इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्होटिंग मशिनमधील घोळाबाबत सध्या देशभर चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल करण्यात आली आहे. लोकसभेत अनेक खासदारांनी यात गडबड असल्याची शंका व्यक्त केली आहे. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनीसुद्धा या मताशी सहमती दर्शवली आहे. नेट इंडियाचे अध्यक्ष हरिप्रसाद, व्ही. लक्ष्मण रेड्डी, व्ही. व्ही. राव सध्या या मशिनमधील फोलपणा दाखवण्यासाठी देशभर जागृती निर्माण करीत आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यादेखील आहेत. याचे प्रात्यक्षिक आज श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात दाखवण्यात आले. हा प्रकार बघण्यासाठी महापौर माया इवनाते, आमदार देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोक धवड, बसपचे प्रवक्ते उत्तम शेवडे, मनपाचे सत्तापक्षनेते अनिल सोले, शिवसेनेचे कृपाल तुमाने उपस्थित होते. त्यांना मतदानातही सहभागी केले.

सर्वांच्या समक्ष इलेक्‍ट्रॉनिक्‍स मशिन ठेवण्यात आले. एक..दोन…तीन याप्रमाणे एकूण पाच उमेदवार निवडण्यात आले होते. याकरिता मतदान घेण्यात आले. एकूण 26 मतदारांनी मतदान केले. यानुसार पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला 12, दुसऱ्या क्रमांकाच्या 5, तिसऱ्या 2, चौथ्याला 2 आणि पाचव्याला 5 मते टाकण्यात आलीत. यानंतर ईव्हीएमनुसार मतमोजणी करण्यात आली. यावेळी मात्र निकाल बदलला. पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला सहा तर दुसऱ्याला 14 मते मिळालीत. तिसऱ्या आणि चौथ्याच्या मतांमध्ये फरक पडला नाही तर पाचव्या क्रमांकाच्या उमेदवाराला फक्त दोनच मते मिळालीत. ठरवून ईव्हीएममध्ये “सेटिंग’ करता येऊ शकते, तसेच कोणत्याही उमेदवाराला जिंकून दिल्या जाऊ शकते, असे हरिप्रसाद यांनी यावेळी सांगितले.

भारतामध्ये चीन आणि जपानमधून ईव्हीएम चिफ मागविण्यात येते. प्रोग्राम तयार करतानाच यात फेरबदल केला जाऊ शकतो. अमेरिकेत 1960 साली सर्वप्रथम ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. यातील त्रुट्या लक्षात आल्यानंतर ईव्हीएमच्यासोबतीला बॅलेट पेपर जोडून यात सुधारणा करण्यात आली आहे. आमचाही ईव्हीएमला विरोध नाही. यात सुधारणा करावी अशी आमची मागणी असल्याचे यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितले.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: