हेमंत आठल्ये

भाजपला बळ देण्यासाठी पुन्हा एक यात्रा!

In बातमी, सकाळ on जुलै 20, 2009 at 12:11 pm

सकाळ– लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे हतबल झालेल्या भारतीय जनता पक्षाला नवे वलय प्राप्त होण्यासाठी आशेचा किरण दिसला आहे. पक्षनेते लालकृष्ण अडवानी यांच्या नेतृत्वाखाली पक्षातर्फे रथयात्रा काढली जाणार आहे. ही रथयात्रा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना “उठा, विजयासाठी सज्ज व्हा,’ असे सांगण्यासाठी, “फिनिक्‍स’ भरारीसाठी आणि त्यांना पुन्हा बळ देण्यासाठी असणार आहे.


“एका निवडणुकीतील पराभव म्हणजे पक्षाने सर्वस्व गमावले असे नव्हे,’ असा कार्यकर्त्यांना संदेश आणि चेतना देण्यासाठी ही रथयात्रा काढली जाणार आहे. कॉंग्रेसची एकाधिकारशाही संपविणे आणि देशाला द्विपक्षीय राज्य पद्धतीकडे नेणे या भाजपच्या खात्यातील दोन सर्वांत मोठ्या आणि अभिमानास्पद अशा गोष्टींची जाणीव कार्यकर्त्यांना करून देणे. तसेच आगामी काळात दिल्लीची सत्ता पुन्हा प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा, हेच यातून कार्यकर्त्यांना सांगायचे आहे, असे अडवानी यांनी नमूद केले. या यात्रेत आपण कोठेही जाहीर सभांमध्ये भाषण करणार नाही असे सांगून अडवानी म्हणाले, “माझ्या यापूर्वीच्या रथयात्रांसारखी ही यात्रा नसेल. माझ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि एखाद्या निवडणुकीतील पराभव म्हणजे फार निराशादायक बाब नाही, हे त्यांना पटवून देण्यासाठी ही यात्रा असेल.”

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक प्रवास करणारे नेते असलेले अडवानी यांनी आपल्या नातवंडाच्या वयाचे असलेल्या कॉंग्रेसच्या राहुल-प्रियांका या भावंडांइतकाच प्रवास करून देश ढवळून काढला होता. आगामी यात्रेदरम्यान अडवानी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना भेटतील, त्यांच्याशी संवाद साधतील आणि त्यांचे शंकानिरसनही करतील.

भाजप कार्यकर्त्यांना पराभवाच्या मानसिकतूेन बाहेर काढण्यासाठी ते स्वतः पुढे सरसावले आहेत. देशभरातील कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी आता अडवानी पुन्हा एकदा रथयात्रा काढून देश ढवळून काढणार आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये ही यात्रा सुरू होण्याचे संकेत आहेत. 
यापूर्वी 1990 मध्ये अडवानी यांच्या सोमनाथ-अयोध्या रथयात्रेनंतरच भाजपच्या लोकसभेतील संख्याबळाने दोनवरून थेट 189 पर्यंत झेप घेतली होती. त्यानंतरच पक्षाला सत्तेची चव चाखण्यास मिळाली होती. त्यानंतर अडवानी यांनी 1993 मध्ये जनादेश यात्रा व 2006 मध्ये भारत सुरक्षा यात्राही काढली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांची ही आगामी रथयात्रा चेतना देणारी ठरेल, अशी आशा भाजप नेत्यांना वाटत आहे.

यात्रेस महाराष्ट्रातूनच प्रारंभ?

सध्या सुरू असलेले संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन ऑगस्टच्या सुरवातीला संपेल, असे सध्याचे वेळापत्रक सांगते. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चिंतन बैठक ऑगस्टमध्ये मुंबईत आहे. यात संघाचे नेतेही सहभागी होतील. त्यापूर्वी पक्षाच्या नव्या खासदारांचे प्रबोधन शिबिर तेथेच होणार आहे. यानंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये अडवानी यांची ही नवीन यात्रा सुरू होईल, असे सांगण्यात येते. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या यात्रेचा नारळही महाराष्ट्रातूनच फोडण्यात यावा, यासाठी राज्यातील भाजप नेते प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: