हेमंत आठल्ये

वीज कर्मचारी संपावर

In बातमी, म. टा. खास on जुलै 21, 2009 at 10:21 सकाळी

म. टा. खास– वेतनवाढ आणि इतर मागण्यांबाबत राज्य विद्युत मंडळाच्या व्यवस्थापनाशी वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या कृती समितीची चर्चा सोमवारी रात्री फिस्कटल्याने मध्यरात्रीपासून तिन्ही वीज कंपन्यांचे कर्मचारी संपावर गेले आहेत. काही संघटनांनी त्याला विरोध केला असला तरी त्यांचे अस्तित्व किरकोळ असल्याने लाखभर कर्मचारी संपात सहभागी होतील, असे कृती समितीचे म्हणणे आहे. या संपामुळे ग्राहकसेवेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) रात्रीच लागू करण्यात आला आहे.

मंडळाच्या ‘प्रकाशगड’ येथील मुख्यालयात तिन्ही कंपन्यांचे एमडी आणि तीसपैकी २४ संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात सायंकाळपासून चचेर्च्या फेऱ्या सुरू झाल्या. रायगडच्या जिल्हा नियोजन समितीच्या दौऱ्यावर असलेले ऊर्जामंत्री सुनील तटकरे हेही प्रतिनिधींशी सतत संपर्क साधून होते. बुधवारी सकाळी पुन्हा कृती समितीच्या प्रतिनिधींना चचेर्साठी बोलावल्याचे तटकरे यांनी सांगितले.

राज्य वीज मंडळाच्या व्यवस्थापनाने १८ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्याची तयारी दाखवली असल्याने, तसेच ऊर्जामंत्री व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा असल्याने संपाचा बेत पुढे ढकलावा, अशी भूमिका तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या कृती समितीतील काही सदस्यांनी घेतली. मात्र, कृती समितीने मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय कायम ठेवला.

पॉवर फ्रंट, विद्युत श्रमिक काँग्रेस, अधिकारी संघटना, भारतीय कामगार सेना, चतुर्थ श्रेणी कामगार संघटना आदी बारा संघटनांनी संपात सहभागी न होण्याचा निर्धार केला आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: