हेमंत आठल्ये

‘अभिनव’मधील आणखी एकाला ‘स्वाइन फ्लू’

In सकाळ on जुलै 22, 2009 at 12:09 pm

सकाळ- पुणे शहरात मंगळवारी “स्वाइन फ्लू’चा आणखी एक रुग्ण सापडला. कर्वे रस्त्यावरील अभिनव विद्यालयातील (इंग्रजी माध्यम) ती आठवी इयत्तेतील मुलगी असून, तिच्यावर महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे या विद्यालयातील “स्वाइन फ्लू’ची लागण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५ झाली आहे.


डॉ. नायडू रुग्णालयात मंगळवारी “स्वाइन फ्लू’चे नऊ संशयित रुग्ण दाखल झाले. त्यांच्या नाकातील आणि घशातील द्रव पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्यापैकी एका मुलीला “एच१एन१’ या विषाणूंचा संसर्ग होऊन “स्वाइन फ्लू’ची लागण झाली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. पाच जणांना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचेही “एनआयव्ही’ने कळविले आहे. त्यातील तीन जणांचे अहवाल रात्री उशिरापर्यंत राज्यातील आरोग्य खात्याला मिळाले नव्हते.


दरम्यान, “स्वाइन फ्लू’च्या संशयित रुग्णांनी घराबाहेर न पडता घरात इतरांपासून वेगळे राहावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आर. आर. परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, “”अभिनव विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना “स्वाइन फ्लू’ची लागण झाली आहे. याचा प्रसार होऊ नये, यासाठी ही शाळा येत्या शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात संशयितांनी इतरांपासून वेगळे राहावे.” या विषाणूंचा कमीत कमी प्रसार होईल, यासाठी ही कार्यवाही करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


नियंत्रण कक्ष परत मुंबईला हलविला
“स्वाइन फ्लू’चा देशात पहिला रुग्ण सापडल्यानंतर राज्यातील स्थितीवर देखरेख करण्यासाठी मुंबई येथे “नियंत्रण कक्ष’ सुरू करण्यात आला होता. त्यासाठी पुण्यातील काही अधिकाऱ्यांचीही रवानगी मुंबईला करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी हा कक्ष पुण्यातील मध्यवर्ती शासकीय इमारतीमधील आरोग्य सेवा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आला होता. यात काही दिवसांपूर्वी बदल करून तो कक्ष मुंबईला हलविण्यात आला आहे. याबाबत आरोग्य खात्यातील सहसंचालक डॉ. पंडित चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “”वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना तातडीने माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. राज्यातील संपूर्ण माहिती येथे संकलित करण्यात येते.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: