हेमंत आठल्ये

उत्तर महाराष्ट्रासाठी ६५०९ कोटींचे पॅकेज

In बातमी, सकाळ on जुलै 23, 2009 at 12:17 सकाळी

सकाळ– उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी सहा हजार ५०९ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक बुधवारी नाशिकमध्ये झाली. त्यामध्ये या पॅकेजची घोषणा करण्यात आली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर नाशिकच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या एकूण पॅकेजपैकी २००९-१० या आर्थिक वर्षात दोन हजार ८५ कोटी रुपये, २०१०-११ या आर्थिक वर्षात दोन हजार १७९ कोटी रुपये आणि २०११-१२ या आर्थिक वर्षात दोन हजार ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

  • मद्यनिर्मिती करणाऱ्या व्यवसायांसाठी व्हॅटमध्ये १६ टक्के कपात
  • मालेगाव, नंदूरबारमध्ये परिचारिका महाविद्यालय सुरू करणार
  • नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नगर या सर्व जिल्ह्यांत नदी जोड प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू करणार
  • विभागातील सर्व १२ नगरपालिकांच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणार
  • नाशिक आणि नंदूरबारमध्ये महिलांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय
  • आदिवासी विकासासाठी ३२१ कोटी रुपयांची तरतूद
  • अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणासाठी नाशिक, मालेगाव, धुळे, नंदूरबार येथे वसतीगृहांची उभारणी करणार
  • प्रत्येक जिल्ह्यात एक नाट्यगृह उभारणार
  • पॅकेज अंतर्गत जलसंपदा विभागासाठी ६५५.७० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्याआधारे २००१.५७ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होईल आणि त्यातून सात हजार २९१ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येईल.
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: