हेमंत आठल्ये

महाराष्ट्रात सूर्यग्रहणाला ढगांचं ‘ग्रहण’

In बातमी, म. टा. खास on जुलै 23, 2009 at 12:28 सकाळी

म. टा. खास– शतकातल्या सर्वात मोठ्या, ऐतिहासिक खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्यापासून मुंबईकरांना आणि एकूणच महाराष्ट्रवासियांना वंचित राहावं लागलं. पावसाचे काळे ढग त्यांना आडवे आले आणि आशाळभूतपणे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या खगोलप्रेमींची निराशा झाली.

महाराष्ट्रात धुळे आणि नंदूरबारमध्ये काही सेकंदांसाठी सूर्यग्रहण दिसणार होतं. त्यामुळे अनेक उत्साही मंडळी कालपासूनच तिथे डेरेदाखल झाली होती. ग्रहण बघण्याच्या उत्सुकतेमुळे अनेकांना रात्रभर झोपही लागली नाही. मात्र त्यांना टेन्शन होतं, पावसाचं आणि काळ्या ढगांचं. त्यासाठी ते वरुणराजाची प्रार्थना करत होते. पण, तो काही त्यांना प्रसन्न झाला नाही. संध्याकाळपासून पडणारा पाऊस, रात्रीही बरसत राहिला आणि पहाटेही. त्यामुळे सूर्यग्रहणाला ढगांचंच ग्रहण लागलं. सूर्यच दिसला नाही, मग सूर्यग्रहण तर लांबचीच गोष्ट नाही का ?

मुंबईत तर सूर्योदयाची वेळ ६ वाजून १३ मिनिटं होती, तर ६.२२ हा ग्रहणमध्य होता. त्यामुळे अनेक मुंबईकर नेहरू तारांगणमध्ये रवाना झाले होते. पालक तर आपल्या मुलांना घेऊन तिथे पोहोचले होते. पण त्यांचं ग्रहणही पावसातच वाहून गेलं.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: