हेमंत आठल्ये

यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिमीच्या गुप्त हालचाली

In बातमी, सकाळ on जुलै 23, 2009 at 5:57 pm

सकाळ– यवतमाळ जिल्ह्यात सिमीच्या कार्यकर्त्यांच्या गुप्त हालचालींत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, केवळ राजकीय स्वार्थासाठी राजकीय नेत्यांनी पोलिस विभागाचे हात बांधल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच सिमी कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुसद येथील दंगल ही त्याचाच परिपाक म्हणून असल्याचे जनमानसांतून बोलले जात आहे.


माना येथे झालेल्या सिमीच्या बैठकीत पुसद व काळी दौलतखान येथील तीन सदस्य सहभागी झाल्याची माहिती पोलिस दफ्तरी आली असून, त्यांचा कसून शोध घेणे सुरू आहे. अप्रत्यक्षरीत्या पुसद-उमरखेड व काळी दौलतखान हा सिमीचा अड्डाच बनला आहे. जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, काळी दौलतखान व त्यामागून यवतमाळ येथे सिमीचे कार्यकर्ते असल्याची पोलिसांकडे नोंद आहे. ही नोंद केवळ 25 कार्यकर्त्यांची असली तरी जिल्ह्यात जवळपास दीडशेहून अधिक कार्यकर्ते असून, समर्थकांची संख्या तर 650 च्यावर पोचली आहे. 2001 मध्ये यवतमाळच्या सिमी कार्यकर्त्याला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. जिल्ह्यात पुसद, उमरखेड, काळी दौलतखान व बाभूळगाव तालुक्‍यांतील एका गावात असलेल्या सिमी कार्यकर्त्याची नोंद झालेली आहे.


विशेष म्हणजे माना येथील बैठकीत पुसद व काळी दौलतखान येथील कमीत कमी दहा सदस्य असल्याची नोंद आहे, त्यापैकी तिघांची नावे पोलिसांत उघड झाली असून, इतरांचा कसून शोध घेण्यात येत आहेत. यापैकी शेख महमूद शेख लाल व शेख इब्राहिम शेख मुसा (दोन्ही, रा. पुसद) यांना मूर्तिजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिवसेंदिवस पुसद, उमरखेड या पाठोपाठ यवतमाळ शहरातही सिमी कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, पोलिस त्यांच्यावर कडी नजर ठेवून आहेत.


राजकारण्यांचा स्वार्थ
याबाबत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, सिमी कार्यकर्ते आणि समर्थकांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, ते कुठे ना कुठे अडल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा नोंदविता येईल, अन्यथा करणार तरी काय, हाच प्रश्‍न आहे. संबंधितांच्या संपूर्ण हालचालीवर लक्ष असल्यामुळे ते अद्यापही दबून आहेत. पुसद येथील दंगल मोठ्या प्रमाणात होणे, हा त्याचाच परिपाक असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बोलून दाखविले. एकंदरित केवळ राजकीय स्वार्थापोटी ही विघातक संघटना फोफावताना दिसत आहे. कारवाई करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ठोस पुराव्याअभावी त्यांना हात लावणेही कठीण झाले आहे, तो प्रयत्नही केल्यास राजकीय पुढारीच सामोरे येत असल्याचे या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.


स्पेशल मोहीमच उभारायला हवी
जिल्ह्यात सिमी कार्यकर्त्यांवर बंदी घालण्यासाठी एक स्पेशल मोहीम उभारल्याशिवाय त्यांच्यावर आळा बसणार नाही, हे नक्की असून त्यांना वेळीच आवर न घातल्यास मोठ्या परिणामाला सामोरे जावे लागले. यामुळे आता जागे होण्याची वेळ आली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: