हेमंत आठल्ये

लंका टीमवरील हल्ल्यामागे ‘रॉ’चा हात?

In म. टा. खास on जुलै 23, 2009 at 11:46 सकाळी

म. टा. खास– लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट टीमवर तसेच पोलिस अकादमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे भारताच्या रॉ या गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचे पुरावे पाकिस्तान सरकारने भारताला दिले आहेत, असे वृत्त पाकमधील डॉन या प्रख्यात दैनिकाने प्रकाशित केले आहे.

पाकमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांचा कसा हात आहे, याचे पुरावे पाकचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे गेल्या आठवड्यात शर्म अल शेखमध्ये झालेल्या बैठकीच्या वेळी सोपवले, असे डॉनच्या बातमीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर हे पुरावे अफगाणिस्तान आणि अमेरिकेलाही पाठवण्यात आले आहेत.

भारताला नेमके कोणते पुरावे देण्यात आले, याबाबत पाक सरकारने कमालीची गुप्तता पाळली आहे. परंतु डॉनकडे जी माहिती उपबल्ध आहे, त्यानुसार श्रीलंका क्रिकेट टीमवरील हल्ला तसेच पोलिस अकादमीवरील हल्ला यामागे रॉ ही भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचे पुरावे देण्यात आले असल्याचे समजते.

हे दहशतवादी हल्ले करणा-यांशी रॉचा जवळचा संबंध आहे आणि ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे पाकला सापडले आहेत, असेही बातमीत नमूद करण्यात आले आहे. श्रीलंका टीमवरील हल्ल्यात जी शस्त्रास्त्रे वापरण्यात आली ती भारतीय होती, त्याशिवाय या हल्ल्याच्या सूत्रधारांची नावेही या पुराव्यांमध्ये होती. भारतीय हद्दीतून बेकायदेशीररित्या या हल्लेखोरांनी पाकमध्ये घुसखोरी केली होती, असे पाकचे म्हणणे आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: