हेमंत आठल्ये

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी

In इन्कम टॅक्स, म. टा. खास on जुलै 24, 2009 at 4:48 pm

म. टा. खास– इन्कम टॅक्स रिटर्न सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै जवळ येत आहे. त्यामुळे करदात्यांची धावपळ सुरु झाली आहे. हे रिर्टन करदाता स्वत: भरू शकतो, तसेच ‘सीए’ किंवा ‘टॅक्स रिटर्न प्रिपेअरर’ (‘टीआरपी’)चे साह्य घेता येते.

परंतु रिर्टनसोबत काही कागदपत्रे लागतात. त्याची जुळवाजुळव करदात्यांनाच करावी लागते. पगारदारांना ‘फॉर्म १६’ द्यावा लागतो. तसेच रिटर्न भरताना कर किती देय आहे व किती आधीच कापून घेण्यात आलेला आहे याची माहिती ‘सीए’ किंवा ‘टीआरपीं’ना अचूक व्हावी यासाठी पासबुकची फोटोप्रत आणि ‘टीडीएस’ सटिर्फिकेट देणे आवश्यक आहे. आपण बँकेत ठेवलेल्या आणि बँकेतून काढलेल्या पैशाची नोंद पासबुकाद्वारे कळू शकते. त्यामुळे तुम्हाला कर किती देणे आहे, याची माहिती मिळते. बँकेत ठेवण्यात आलेल्या काही पैशावर कर लागू होतो, तर काही पैशावर कर द्यावा लागत नाही. भांडवली मिळकतीवर करमाफी मिळते.

बँकेतून केलेल्या सर्वच खर्चावर करमाफी मिळत नाही. त्यासाठी तुम्ही पगारदार आहात, उद्योजक आहात की व्यावसायिक, यावरही करमाफी अवलंबून आहे. त्यामुळे काही खर्चावर करसवलत मिळते, काही खर्चावर नाही. पासबुकातील नोंदींवरून भांडवली लाभाचे गणित मांडले जाते.

बऱ्याच वेळा पासबुकातील नोंद संक्षिप्त स्वरूपात असते. त्यावरून जमा किंवा खर्चाचे कारण समजू शकत नाही. त्यावर उपाय म्हणजे पासबुकात नोेंद केल्यावर त्यासंबंधी सविस्तर माहिती लिहून ठेवणे आवश्यक आहे. पैसे भरलेले असतील तर ‘पे स्लिप’च्या मागे पैसे कोठून आले, त्याबाबत थोडक्यात लिहून ठेवणे. त्यासाठी समांतर पासबुक तयार करावे.

पासबुकाप्रमाणेच ‘टीडीएस’ सटिर्फिकेट म्हणजे आगाऊ भरण्यात आलेल्या कराचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे अंतिम कर किती देणे आहे, ते या ‘टीडीएस’ सटिर्फिकेटवरून समजते. ही सटिर्फिकेट नसेल तर आगाऊ कराची माहिती मिळत नाही, परिणामी पुन्हा कर भरावा लागणार.

नव्या ‘आयटीआर फॉर्म’सोबत ‘टीडीएस’ सटिर्फिकेट जोडण्याची सक्ती नाही. परंतु, ‘टीडीएस’ची माहिती देताना ज्यांनी ‘टीडीएस’ कापलेला आहे, त्यांचे ‘टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर (‘टॅन’) द्यावा लागतो. ही माहिती आणि ‘टॅन’ या सटिर्फिकेटवरूनच मिळतो. आताचा रिटर्न फॉर्म भरताना तसेच पुढील वर्षाची तयारी करण्यासाठी ही काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: