हेमंत आठल्ये

नागपूर-मुंबई दुरांतो फास्ट ट्रेन ऑगस्टपासून

In बातमी, म. टा. खास on जुलै 24, 2009 at 5:59 pm

म. टा. खास– आठवडयातून तीनवेळा धावणा-या नागपूर-मुंबई आणि मुंबई-नागपूर दुरांतो फास्ट ट्रेनला १५ ऑगस्टचा मुहूर्त लाभणार असल्याचे रेल्वेच्या गोटातून सांगण्यात येते. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना लोकप्रतिनिधींची मागणी मान्य करीत या विशेष रेल्वेगाडीची घोषणा केली होती.

फक्त साडेअकरा तासांमध्ये प्रवासाचे अंतर पार करणा-या या ट्रेनला अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून नागपूर विभागीय रेल्वे अधिकारी खास उपाय योजण्याच्या तयारीला लागले आहेत. मुंबईहून ही गाडी मंगळवारी , गुरूवारी आणि रविवारी सुटेल (वेळ रात्री ८ . १५ ) तर नागपूरहून सोमवार , बुधवार आणि शुक्रवारी (वेळ रात्री .२५) निघेल. कसारा आणि इगतपुरी या दोन ठिकाणीच तिला थांबे असतील.

एकंदर १७ डब्यांच्या गाडीत दोन द्विस्तर वातानुकूलित , तीन त्रिस्तर वातानुकूलित आणि १० साधारण शयनयान असतील.

दरम्यान , हावडा-मुंबई दुरांतो फास्ट ट्रेनही आठवडयातून दोनदा (शुक्रवार आणि सोमवार) सोडण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. या गाडीला नागपूरचा थांबा असल्याने तिचा फायदा नागपूरकरांना होईल. या गाडीचा परतीचा प्रवासही आठवडयातून दोनदा आहे. ती शनिवारी आणि मंगळवारी मुंबईहून हावड्याकडे रवाना होईल.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: