हेमंत आठल्ये

विधानसभा स्वबळावर लढणार : राज ठाकरे

In सकाळ on जुलै 24, 2009 at 11:36 pm

सकाळ– स्वत:चे खिसे फाटके असणारे आघाडी शासन आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विभागनिहाय पॅकेजचा पाऊस पाडत जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करून राज्य शासनाच्या उत्तर महाराष्ट्र पॅकेजची खिल्ली उडविली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्याची आपली इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक येथे विविध विकास कामांचे उदघाटन आणि स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन शिबिराच्या समारोप कार्यक्रमासाठी शुक्रवारपासून राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्याप्रसंगी प. सा. नाट्यगृहात झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर मनसेचे सरचिटणीस वसंत गिते, अतुल चांडक, अतुल सरपोतदार, श्री. अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, माजी खासदार ऍड. उत्तम ढिकले, प्रकाश दायमा, हेमंत गोडसे, महानगरप्रमुख नितीन भोसले, सुनील गायकवाड, खंडेराव मेढे, श्रीमती उत्तरा खेर, सौ. सुजाता डेरे हे उपस्थित होते. कर्जात बुडालेले महाराष्ट्र शासन पॅकेज जाहीर करून त्यासाठी लागणारा पैसा कोठून आणणार, असा प्रश्‍न उपस्थित करत ठाकरेंनी हे सगळं निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकांना मुर्खात काढण्याचा प्रकार असल्याचे सांगितले. तिसरा भिडू आपल्याबरोबर येणार असल्याचे गोपीनाथ मुंडे परस्पर जाहीर केल्याच्या मुद्द्यावर बोलताना  मुळात तुमच्या युतीला विचारत कोण असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. आघाडी आणि युती हे मराठी माणसासाठी नव्हे तर त्यांच्या मतांसाठी भांडण करत आहे. आपला पक्ष कोणाची सोय लावण्यासाठी नसून, पक्षात कोणाचाही थिल्लरपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. आजकालचे नेते म्हणजे फेरीवाले आणि पक्ष म्हणजे फुटपाथ झाला आहे. अशा प्रकारची संस्कृती आपल्या पक्षात वाढवू देणार नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कोणी पक्षात प्रवेश करणार असेल, तर अशांनी मनसेत येण्याचा विचारही करु नये, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

परप्रांतियांच्या प्रश्‍नावर पुन्हा एकदा राज यांनी मेळाव्यात सडकून टीका केली. कर्नाटक येथे उत्तरप्रदेश आणि बिहारी तरूणांवर हल्ला झाला तेव्हा संसदेत कोणी बोलले नाही. मात्र, महाराष्ट्रात असा प्रकार झाला की लगेचच आवाज उठविला जातो, याचे कारण युपी आणि बिहारी नेत्यांना महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा आहे. मागणी नसताना पाटणा-पुणे, पाटणा-कोल्हापूर रेल्वे सुरू केली जाते, याचा जाब कधी आपल्या खासदारांनी विचारला आहे का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह आणि मायावती गप्प बसले असले तरी आपण मात्र बेसावध राहता कामा नये, असे सांगत मराठी माणसावर अन्याय होईल तिथे आवाज उठवा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सरचिटणीस वसंत गिते, ऍड. ढिकले, मेढे आदींची भाषणे झाली.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: