हेमंत आठल्ये

वेळेचा सदुपयोग

In म. टा. खास on जुलै 27, 2009 at 10:16 pm

म. टा. खास– पावसामुळे सुट्टीत टाइमपास खूप झाला. पण असं वारंवार झालं तर रोज टाइमपास करणार का, शाळा-कॉलेजपासून जॉबगोइंग क्राऊडपर्यंत सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो. अशी सुट्टी पुन्हा मिळालीच, तर ती मुळीच वाया घालवू नका. त्यात काही महत्त्वाची कामं घरच्याघरीच पूर्ण करता येतील.

* इण्टरनेट सर्फिंग
घरी नेट असेल तर सफिर्ंग करा. यातून वेगवेगळ्या संधींचा शोध तुम्हाला घेता येईल. करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही या वेळेचा वापर करू शकता. पारंपरिक क्षेत्राबरोबरच कोणत्या ऑॅफ बीट क्षेत्रात तुम्हाला प्रवेश करता येईल का, याची माहिती इण्टरनेटवरून मिळवता येते. वेगवेगळी उपलब्ध क्षेत्रं, तसंच या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींची माहिती तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकेल. जनरल नॉलेज वाढवण्यासाठी किंवा इतर फिल्मी, सेलिब्रेटीजचं गॉसिप अपडेट ठेवण्यासाठीही याच इन्फमेर्शन टेक्नॉलॉजीची मदत घेता येईल.

* स्किल डेव्हलपिंग
पर्सनॅलिटी डेव्हलपमेण्टच्या दृष्टिकोनातूनही हा वेळ तुम्हाला वापरता येऊ शकतो. इंग्रजी कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी इंग्रजी वर्तमानपत्रं, पुस्तकं, मासिकं वाचणं आणि इतरांशी इंग्रजीतून गप्पा मारणं हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. तुमच्या छंदांनाही हा वेळ देता येईल. वाचन, इनडोअर स्पोटर्स, म्युझिक तसंच कॅण्डल, पेपर बॅग्ज, सॉफ्ट टॉइज मेकिंग, पेण्टिंग अशा विविध हॉबीज तुम्ही या वेळात पूर्ण करू शकता. छंदांचं रूपांतर व्यवसायात कसं करता येईल, याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठीही याची मदत घेता येईल.

* अपग्रेडेशन
एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिविटीजची माहिती मिळवा. आपल्याला कोणत्या उपक्रमात सहभागी होता येईल, याचा निर्णय घेण्यासाठीही हा वेळ आपलाच आहे, हे लक्षात ठेवा. शिवाय फिटनेसचा प्रोग्राम आखता येईल. कॉण्टॅॅक्ट डायरी अपडेट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. डिजिटल डायरी किंवा कम्प्युटरवर डेटा फीड करता येऊ शकतो. बरेच पूर्ण करायची राहिलेली कामं पूर्ण करता येतील.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: