हेमंत आठल्ये

‘अरिहंत पाणबुडी’: शस्त्रसज्जतेचा कळस !

In बातमी, म. टा. खास on जुलै 28, 2009 at 4:26 pm

म. टा. खास– २६ जुलै रोजी ‘ आयएनएस अरिहंत ‘ ही देशांतर्गत विकसित केलेली आण्विकपाणबुडी भारतीय नौदलात सामीलझाली अशाप्रकारे भारताने संरक्षणक्षेत्रात एक महत्वपूर्ण टप्पा पार केलाआहे . ‘ अरिहंत ‘ पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे आण्विक इंधनावर चालणारीही भारताची पहिली पाणबुडी आहे हजार टन वजनाची ही पाणबुडी ११०मीटर लांब आणि ११ मीटर रुंद आहे . ‘ अरिहंत ‘ वर १०० खलाशी आणि सैनिक राहू शकतात आणि ती एकाचवेळी ९० दिवसापर्यंत कार्यरत राहू शकते . ‘ अरिहंत ‘ ची मारक क्षमता ७००किलोमीटर एवढी आहे आण्विक इंधनावर चालणारी पाणबुडी असणारा भारत हाजगातला सहावा देश झाला आहे .

युद्धसज्जतेच्या दृष्टिकोनातून ‘ अरिहंत ‘ भारताची आण्विक शस्त्राबाबतची विचारधाराआणखी मजबूत करते कारण आण्विक इंधनामुळे ‘ अरिहंत ‘ ची क्षमताभारताच्या पारंपरिक पाणबुड्यांपेक्षा अनेक पटीने वाढली आहे त्यामुळे जरभारताला एखाद्या मोठ्या युद्धाला सामोरे जावे लागले आणि शत्रूच्या प्रथम हल्ल्यातभारताची जमिनीवरची अण्वस्त्रे आण्विक हल्ल्यात नष्ट झालीच तर ‘ अरिहंत सारखी पाणबुडी भारताच्या अण्वस्त्रक्षमतेचा शत्रूच्या नजरेपासून सांभाळू करू शकतेआण्विक इंधनावर चालणारी पाणबुडी जास्त दिवस पाण्याखाली राहू शकते नव्यासंशोधनामुळे शत्रूला ‘ अरिहंत ‘ चा अचूक ठिकाणा आणि मार्गाविषयी निदानकरणेही अवघड आहे याचा एकूण परिणाम म्हणजे आता आपले सुरक्षा नियोजकआपल्या अण्वस्त्राच्या सुरक्षेबाबत निश्चिंतही राहू शकतात .

भारताची ही नवी पाणबुडी शत्रूंना भारतावर अण्वस्त्रहल्ला करण्याआधी पुनर्विचारकरण्यास भाग पाडेल कारण अशाप्रकारचा हल्ला करून त्यांना भारताची संपूर्णआण्विक शस्त्रे संपवण्यात कधीच पूर्णतः यश मिळणार नाही याउलट ‘ अरिहंत ची जागा आणि त्यावरील शस्त्रांची माहिती नसल्यामुळे शत्रूच्या आत्मविश्वासातफरक पडू शकतो एकंदरीत या गटातल्या पाणबुडीच्या समावेशामुळे दक्षिणआशियातील अण्वस्त्रयुद्धाची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे .

‘INS अरिहंत आणि पाकिस्तानचा कांगावाः
पाकिस्तानला भारताची ही नवी क्षमता योग्य प्रकारे समजून घ्यावी लागणार आहे दुर्दैवाने आपला शेजारी दूरदृष्टिने विचार करण्यासाठी अजूनही तयार झालेला नाही .पाकिस्तानने भारताच्या या कृतीवर टीका केली आहे एकूणच पाकिस्तानची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होती कारण प्रादेशिक भेदभाव आणि आतंकवादाने त्रस्त झालेल्या पाकिस्तानचे नेतृत्व आता आण्विक शस्त्रांच्या नावाखाली पाकिस्तानात राष्ट्रवाद रेटू शकत नाही भारताची कुठलीही कृती नकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची आणि त्यानावाखाली आपले अस्तित्व सांभाळण्याची सवय पाकिस्तानी नेतृत्वाला झाली आहे त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेकडे आपण डोळेझाक करू शकतोपण जगातले इतर देश पाकच्या या कांगाव्याला बळी पडून त्याला आधुनिकहत्यारे देणार नाही याची खात्री बाळगावी लागेल कारण यापूर्वी असे झालेले आहे.
पाकिस्तान कदाचित चीनची भाषा तर बोलत नाही ना हेही आपल्याला लक्षात घ्यावेलागेल चीनने हिंद महासागरात स्वतःची रुची दाखवलेली आहे अमेरिकेविरुद्धजर युद्ध करावे लागले तर पश्चिम आशिया मधून येणा – या तेलाचे मार्ग सुरक्षितठेवावे लागतील हे चीनचे नेतृत्व जाणून आहे कारण त्याशिवाय चीनची अर्थव्यवस्था ठप्प होईल त्यामुळे चीनच्या सैन्याच्या आधुनिकीकरणात नौदलावरमोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे भारतालादेखील हे गणित विसरून चालणार नाही .

वाढत्या आर्थिक आणि सामरिक गरजांचे रक्षण करण्यासाठी भारताची नौदलयुद्धक्षमता सुसज्ज असणे अत्यावश्यक आहे त्यामुळे भारताचे हे पाऊल योग्यअसेच आहे येत्या दोन वर्षात ‘ आरिहंत ‘ च्या अनेक चाचण्या होतील त्यानंतरती पूर्णपणे कार्यरत होणार आहे आपली ही पहिली आण्विक पाणबुडी महत्वाचीआहे पण हे पूर्ण यश नाही कारण चीनकडे आत्ता अश्या दहा पाणबुड्या आहेत आणि त्यांची क्षमता कितीतरी पटीने अधिक आहे शिवाय येत्या काळात त्यांचीक्षमता कितीतरी पटीने वाढणार आहे .

स्वतः विकसित केलेल्या आण्विक पाणबुडीचे प्रॉजेक्ट तसे जुनेच आहे त्यावर मोठाखर्चही झालेला आहे भविष्यात आपल्याला आपली संरक्षण क्षमता मात्र स्वतःच्याच जोरावर विकसित करावी लागणार आहे आणि याला पर्यायही नाही .रशियाकडून ‘ अॅडमीरल गोर्शकोव्ह ‘ या युद्धनौकेबाबत मिळणारी सापत्न वागणूक देशासाठी अपमानकारक अशीच आहे पण गरजेमुळे भारताचे हात बांधलेले आहेतअमेरिकेशी सुधारणारे संबंध देखील पुरेसे असणार नाहीत कारण त्यांची शस्त्रसंपदा देखील जाचक आणि किचकट अटींनी बांधलेली असेल म्हणूनच संरक्षण संशोधन आणि विकासावर भारताला अधिक लक्ष द्यावे लागेल वैज्ञानिक संशोधनाचेक्षेत्र अधिक आकर्षक करावे लागेल वैज्ञानिक कौशल्याला विकसित करावे लागेल .

Advertisements
  1. शस्त्रसज्जतेचा कळस वगैरे मुळीच नाही. अरिहंत सारख्या चार्ली प्रकारतल्या पाणबुड्या अमेरिकादी देश जवळपास वीस वर्षांपुर्वी वापरत होते…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: