हेमंत आठल्ये

मनसेविरुद्ध षडयंत्र!

In बातमी, म. टा. खास on जुलै 29, 2009 at 10:02 सकाळी

म. टा. खास– इथे महिला सुरक्षित नाहीत, कार्यकर्ते बलात्कार करतात, असे काहीजण म्हणतात. बलात्कार करा, असा मी काही पक्षादेश काढलेला नाही. एखाद्या कार्यर्कत्याचे डोके फिरले आणि त्याने बलात्कार केला, तर कुठलाच पक्ष काहीच करू शकत नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळेच पक्षाला नामोहरम करण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. महिलांना मनसेत स्थान नाही, तरुण कार्यकतेर् बलात्कार करतात, अशा प्रकारचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केला.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मनसे शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात राज बोलत होते. पक्ष सोडणाऱ्यांविषयी मला काहीच म्हणायचे नाही. मात्र, विनाकारण टीका करणाऱ्यांना लाजा कशा वाटत नाहीत, असा टोला राज यांनी श्वेता परुळकर तसेच प्रकाश महाजन यांचे नाव न घेता लगावला.

ज्याला पक्ष सोडून जायचे असेल त्याने खुशाल जावे. दोन कार्यकतेर् उरले तरी त्यांचे २ कोटी कार्यकतेर् बनविण्याची माझ्यात ताकद आहे, असे सांगताना, तुम्ही जनतेची कामे करणार नसाल, त्यांना दिलासा देणार नसाल, तर मला निवडणुकाच लढवायच्या नाहीत, अशी तंबी राज यांनी कार्यर्कत्यांना दिली. कोणत्याही शाखाध्यक्षाने तोडबाज्या करून उमेदवारांची नावे पुढे करायची नाहीत. योग्य असलेल्यालाच उमेदवारी मिळेल व त्याचाच प्रचार करण्याचा आदेश त्यांनी दिला. राज ठाकरे कुठे आहेत, काहीच करीत नाहीत, असे अनेक जण म्हणताहेत. विधानसभा निवडणुकांआधी मला राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडायची असून त्याचेच मी काम करीत आहे. विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा खेळखंडोबा सुरू झालाय. एखाद्याला आलेला झटका हा सरकारी निर्णय होऊ शकतो का? याचा मी समाचार घईन. अॅडमिशननंतर मी सर्व याद्या तपासणार आहे, असे राज म्हणाले.
……..

शेपट्यांचे काय झाले?

म्हाडावरील मोर्चा दरम्यान सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या बिल्डरांच्या शेपट्या धरून त्यांना बिळातून बाहेर काढण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कालच्या ‘सामना’मध्ये वरून खालपर्यंत सगळ्या शेपट्याच दिसत होत्या, असे सांगत राज यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: