हेमंत आठल्ये

सायबर वॉर

In म. टा. खास, संगणक on जुलै 31, 2009 at 2:04 सकाळी

म. टा. खास– अलिकडेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला सायबर वॉरचं तंत्र वापरून बराच त्रास दिला होता. चीन आणि पाकिस्तानतील तज्ज्ञ सायबर वॉरच्या तंत्राचा उपयोग करून भारताला हैराण करत असल्याच्या बातम्या येतच असतात. आहे तरी काय हे सायबर वॉर?

विशिष्ट प्रकारच्या कम्प्युटर प्रोग्रामचा एखाद्या कम्प्युटरमध्ये प्रवेश झाला की, संबंधित मशिनमध्ये गांेधळ उडतो. मूळ माहिती नष्ट होते, तिच्यात बदल होतात अथवा या माहितीचा गैरवापर होतो. हे सगळं सुरू असतं त्यावेळी कम्प्युटर नियंत्रकाला समजत नाही किंवा समजलं तरी थांबवणं कठीण जातं. सायबर वॉर सुरू झाल्याची ही सारी लक्षणं. यात मनुष्यहानी टाळून शत्रूचं प्रचंड नुकसान करणं शक्य होतं.

सीडीतून एखाद्या कम्प्युटर प्रोग्रॅमच्या आड लपवून (हाइड करून), इ-मेलवर अॅचॅच्ड फाइलच्या रूपात किंवा एखाद्या डाऊनलोडेबल फाइलच्या रूपात असलेला त्रासदायक प्रोग्रॅम आपल्या मशिनमध्ये शिरला की हल्ला सुरू होतो. हे त्रासदायक प्रोग्रॅम काही वेळा सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सरकारी किंवा एखाद्या महत्त्वाच्या संस्थेच्या यंत्रणेतही प्रवेश करतात. त्यासाठी संबंधित संस्थेच्या मुख्य कम्प्युटरमध्ये (र्सव्हर) प्रवेश करणं, हेच एकमेव लक्ष्य असतं. अनेक महत्त्वाच्या संस्था स्वत:ची यंत्रणा सुरक्षित करण्यासाठी फायरवॉल, अँटी व्हायरस यंत्रणा सज्ज ठेवतात. मात्र या यंत्रणेला चकवून हल्लेखोर मोठे नुकसान करण्याचा प्रयत्न सतत करत असतात.

अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर, कम्प्युटरसाठी शून्य आणि एक यांच्या समन्वयातून एक बायनरी कोडची भाषा तयार करण्यात येते. यात तीन आकड्यांचा विशिष्ट आदेश असल्यास तो ०००, १११, १००, ००१ आदी पैकी काही तरी एक असतो. हल्लेखोर अर्थात हॅकरला यातील कोणत्या आकड्यांच्या समन्वयाचा कोणता आदेश अंमलात आणण्यासाठी उपयोग होतो हे सतत हल्ले करून ओळखावं लागतं. जास्त आकड्यांची संख्या असल्यास त्याला जास्त पर्यायांचा विचार करावा लागतो. जोवर भाषेचा अर्थ कळत नाही तोवर कम्प्युटरमध्ये प्रवेश करण्याचं दार हॅकरसाठी बंदच असतं. त्याला दादागिरी करता येत नाही. फायरवॉल आणि अँटी व्हायरससारख्या संरक्षणासाठीच्या यंत्रणा या नेहमीच जास्त आकड्यांची एखादी मोठी संख्या असते. त्यामुळे सुरक्षा भेदून मुख्य प्रोग्रॅमपर्यंत पोहोचण्यासाठी हॅकरला वेळ लागतो. पण त्याने शिरकाव केलाच तर घुसखोरी करुन कम्प्युटरवरची जुनी माहिती पुसणं, संबंधित कम्प्युटर हा र्सव्हर असल्यास त्याच्याशी जोडलेल्या कम्प्युटरमध्ये शिरकाव करुन गांेधळ घालणे असे उद्योग हॅकर करू शकतो.

एकदा हॅकरला हे जमलं आणि त्याने कम्प्युटरवर नियंत्रण मिळवलं की, आपण कम्प्युटर हॅक झालाय, असं म्हणतो. जर र्सव्हरवर हल्ला झाला आणि तिथे एखाद्या वेबसाइटची माहिती असेल तर संबंधित वेबसाइटची संरक्षण यंत्रणा भेदून वेबसाइटवर स्वत:ला सोईची माहिती टाकणंही शक्य होतं. हॅकर अगदी कम्प्युटरच्या मदतीने चालणारी वीज पुरवठ्याची यंत्रणा बिघडवू शकतात, एखाद्या कंपनीचं किंवा अणुभट्टीचं काम थांबवू शकतात. बँकेचे व्यवहार ठप्प करू शकतात. पासवर्ड चोरून एखाद्या इ-मेल किंवा सोशल कम्युनिटी साइटवरच्या अकाऊण्टचा गैरवापर करू शकतात. एखाद्याच्या खात्यातले पैसेही स्वत:कडे वळवू शकतात.

एकूणच सुरक्षा भेदणं जमलं तर हॅकर वाट लावू शकतो. त्यामुळे लुटालूट करण्यासाठी आणि एखाद्या देशाची यंत्रणा बिघडवून टाकण्यासाठी शत्रू देश आणि दहशतवाद्यांचे तज्ज्ञ सायबर वॉरचा पर्याय निवडून वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न करत असतात.

हॅकरला रोखण्याचे उपाय

हॅकरला जसे सायबर वॉर खेळून प्रतिपक्षाचे नुकसान करता येतं अगदी तसंच आपणही त्याला धोबीपछाड घालू शकतो. यासाठी अँटी व्हायरस आणि फायरवॉलच्या यंत्रणेत सतत बदल करून ती नवी आणि भक्कम ठेवण्याचा प्रयत्न करायलाच हवा. या कृतीमुळे हॅकरला संरक्षण यंत्रणा भेदणं, तिच्याविषयी अंदाज बांधणंच कठीण होईल. दुसरा पण तितकाच महत्त्वाचा उपाय म्हणजे जिथे पासवर्ड वापरतोय त्या सर्वच ठिकाणी आपला पासवर्ड ठराविक दिवसांनी बदलावा आणि अर्थातच तो गुंतागुंतीचा असाच वापरावा.

काही यंत्रणांचा उपयोग करताना की-बोर्ड ऐवजी मॉनिटरवर दिसणाऱ्या र्व्हच्युअल की-बोर्डचा पर्याय असतो. अशावेळी माऊस किंवा टचस्क्रीनद्वारे त्या बोर्डवरील बटणांचा उपयोग करून पासवर्ड टाइप करावा आणि त्याच्याबाबतीत गोपनीयता पाळावी.

कुठलाही नवा प्रोग्रॅम किंवा सीडी वापरताना आणि इ-मेलची अॅटॅच्ड फाइल डाऊनलोड करून घेताना फायरवॉल आणि अँटी व्हायरस सॉफ्टवेअरच्या मदतीने स्कॅन करून सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: