हेमंत आठल्ये

कृत्रिम पाउस म्हणजे काय ?

In म. टा. खास on ऑगस्ट 2, 2009 at 12:05 pm

म. टा. खास– जगभरात सध्या २४ देशांमध्ये अशा प्रकारे कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू आहेत. आतापर्यंत चीनमध्ये जगातला सर्वात मोठा कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला आहे. २००८ साली बिजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक सामन्यांपूवीर् हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी या शहरात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. चार महिन्यांच्या दुष्काळानंतर बिजिंगमध्ये फेब्रुवारी २००९मध्ये पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला.

पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. क्लाउड सिडिंगमध्ये हेच मुलभूत तत्त्व वापरण्यात येत आहे.

रेनमॅन म्हणवले जाणारे श्यामलाल मेकोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत क्लाउड सिडिंगचा प्रयोग होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा तलावांपैकी तानसा आणि वैतरणा या दोन तलावांवर हा प्रयोग होईल. त्यासाठी मेकोनी यांनी पालिकेच्या ३५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. तलावांच्या दोन किलोमीटर परिसरात फरनेस ठेवण्यासाठी दहा ठिकाणं निवडली गेली आहेत. या फरनेसमध्ये सिल्वर आयोडाइड गरम केलं जाईल. ढगांची क्षमता पाहून विशिष्ट वेळी फरनेसमधलं तापमान १३०० डिग्री सेंटीग्रेडपर्यंत वाढवण्यात येईल. प्रत्येक फरनेसमध्ये गरम होण्यासाठी ठेवण्यात आलेल्या ३०० ग्रॅम सिल्वर आयोडाइडच्या हिरवट-पिवळ्या वाफा फनेलच्या मदतीने आकाशात सोडल्या जातील. दहा ठिकाणी करण्यात येणाऱ्या या प्रयोगासाठी तीन किलो सिल्व्हर आयोडाइड आवश्यक आहे. अशा प्रकारचा प्रयोग महापालिका २० वेळा करणार आहे. या प्रयोगावेळी हवेतल्या बाष्पाचं प्रमाण, वाऱ्याची दिशा आणि तापमान हेदेखील लक्षात घेतलं जाईल, तसंच ढगांमधल्या तापमानावरही नियंत्रण ठेवण्यात येईल. सिल्वर आयोडाइडच्या जोडीला काही वेळा ड्राय आइस, पोटॅशिअम आणि सोडिअम क्लोराइडचा उपयोगही केला जातो. यामुळे ढगांमधल्ये बाष्पाचं मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती तयार होते. काही वेळा हे केमिकल्स ढगांमध्ये पाठवण्यासाठी जमिनीवरून किंवा विमानातून रॉकेटचा मारा केला जातो.

क्लाउड सिडिंग करण्याचा प्रयोग केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. संपूर्ण देशावरच दुष्काळाचा फेरा असल्याने अर्थ सायन्स मंत्रालयाने देशासाठी क्लाउड सिडिंग प्रोगाम हाती घेतला आहे. पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रापिकल मीटीओरोलॉजी (आयआयटीएम) कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे. क्लाउड एरोसॉल इन्टरअॅक्शन अॅण्ड प्रेसिपिटेशन एन्हान्समेण्ट एक्सपरिमेण्ट (कायपीक्स) हा प्रयोग तीन वर्षांसाठी आहे. या मे महिन्यात त्याची सुरुवात झाली आहे. हा प्रयोग तीन टप्प्यांमध्ये होईल.

पहिला टप्पा मे ते ऑक्टोबरमध्ये होणार असून या काळात देशावर असलेल्या ढगांचे विशेष उपकरणं लावलेल्या विमानातून निरीक्षण केलं जाईल. यात तापमान, वारा, दवरूप पाण्याचे थेंब तपासणारी यंत्रणा असेल. या निरीक्षणामुळे देशातल्या विविध भागात असणाऱ्या ढगांची माहिती गोळा होईल. आयआयएमटीने याआधीच पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागातल्या ढगांचा अभ्यास पूर्ण केला आहे. जून ते सप्टेंबर २०१० मध्ये या प्रयोगाचा दुसरा टप्पा होणार असून त्यात काही ठिकाणी क्लाउड सिडिंगचा प्रयोग केला जाणार आहे. यावेळी विमानाच्या मदतीने ढगांवर हायग्रोस्कोपिक पाटिर्कल्स (मीठ) टाकले जाईल. यामुळे ढगांमधल्या बाष्पाचं पाण्याच्या मोठ्या थेंबांमध्ये रुपांतर होण्याची क्रिया सुरू होईल. ढगांच्या वैशिष्ट्यांनुसार संपूर्ण भारतभर क्लाउड सिडिंग केलं जाईल. २०११-१२ मध्ये होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात संशोधक या प्रयोगाच्या परिणामांचं विश्लेषण करतील. यासाठी प्रयोग करण्यात येणाऱ्या भागांमध्ये ऑटोमेटिक रेन गेजचं (पर्जन्यमापक) नेटवर्क उभारण्यात येईल. क्लाउड सिडिंग केलेल्या आणि न केलेल्या ढगांमधून पडलेला पाऊस मोजला जाईल. या पाण्याचं केमिकल अॅनालिसिस केल्यावर प्रयोगाचे निष्कर्ष काढता येतील. या प्रयोगांमुळे कोणता भाग क्लाउड सिडिंगसाठी योग्य असून त्यामुळे पावसाच्या प्रमाणात किती वाढ झाली ते निश्चित करता येईल. आयआयटीएमसह आयआयटी कानपूर, इंडियन एअर फोर्स आणि इंडियन नेव्हीही या प्रयोगात सहभागी होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: