हेमंत आठल्ये

‘पुणे फेस्टिव्हल’ २८ ते ३० ऑगस्टदरम्यान होणार

In सकाळ on ऑगस्ट 2, 2009 at 2:59 सकाळी

सकाळ– पुणेकरांचे खास आकर्षण असलेला भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे ‘पुणे फेस्टिव्हल’ २८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या ‘फेस्टिव्हल’मध्ये पाहायला मिळणार आहे. सोहळ्याचे २१ वे वर्ष आहे. पुण्याचे खासदार आणि ‘पुणे फेस्टिव्हल’चे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘फेस्टिव्हल’चे उद्‌घाटन २८ ऑगस्टला सायंकाळी साडेचार वाजता प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी जम्मू-काश्‍मीरचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला उपस्थित राहाणार आहेत. या ‘फेस्टिव्हल’च्या उद्‌घाटन सोहळ्याच्या प्रसंगी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन होणार आहे.

ज्येष्ठ गायिका, पंडिता किशोरी अमोणकर यांचे गायन होणार आहे. ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कारा’साठी यंदा हरिप्रसाद चौरासिया, प्रख्यात गायिका मुबारक बेगम, ज्येष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर, प्रख्यात उद्योजिका किरण मुझुमदार शॉ यांची निवड झाली आहे. उद्‌घाटन सोहळ्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निर्मित ‘शिवकल्याण राजा’ आणि ‘लावणी बावन खणी’ हा कार्यक्रम होणार आहे. भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी ‘हरिविठ्ठल’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांनी हा कार्यक्रम वडिलांना समर्पित केला आहे. या वेळी निळू फुले यांच्या कारकिर्दीवर आधारित चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. शाहीर साबळे, सुबोध भावे, शाहीर हेमंत मावळे पोवाडा सादर करणार आहेत. महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अनेक दर्जेदार मराठी नाटके होणार आहेत. ‘व्हिटेंज कार रॅली’, महिलांसाठी ‘पुणे फेस्टिव्हल गृहलक्ष्मी स्पर्धा’, असे अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम बालगंधर्व नाट्यमंदीर, यशवंतराव चव्हाण, टीळक स्मारक आदी ठिकाणी होणार आहेत. पत्रकार परिषदेला फेस्टिव्हलचे प्रमुख समन्वयक कृष्णकांत कुदळे उपस्थित होते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: