हेमंत आठल्ये

स्वातंत्र्यदिनी घातपात करण्याचा कट

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 7, 2009 at 3:53 pm

म. टा. खास– दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी रात्री पांढ-या सँट्रो कारमधून जात असलेल्या हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना दरियागंज भागातून अटक केली. त्यांच्या चौकशीतून स्वातंत्र्यदिनी घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे उघड झाले आहे.

पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे जावेद अहमद आणि आशिक अली अशी आहेत. त्यांना दरियागंजच्या महावीर पार्किंग येथे अटक करण्यात आली, असे स्पेशल सेलचे सहपोलिस आयुक्त पी एन अगरवाल यांनी सांगितले. दहशतवाद्यांकडून दोन एके-४७ रायफल, १०० काडतुसे आणि दोन हातबॉम्ब (हँडग्रेनेड) जप्त केल्याचेही ते म्हणाले.

गुप्तचर दलाने लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना स्वातंत्र्यदिनी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकातासह देशातील प्रमुख शहरांमध्ये घातपात करण्याची शक्यता असल्याचे केंद्र सरकारला सांगितले होते. माहिती मिळताच केंद्र सरकारने दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना अलर्ट दिला होता. भारत-पाक सीमेवरही सावधगिरी बाळगण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या दिल्ली पोलिसांच्या गुप्तचरांनी दिलेल्या माहिती आधारे स्पेशल सेलने गुरुवारी सापळा रचून दहशतवाद्यांना पकडले

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: