हेमंत आठल्ये

मुंबईत ‘स्वाइन फ्लू’चा पहिला बळी, देशातला दुसरा

In म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 8, 2009 at 10:19 pm

म. टा. खास– संपूर्ण राज्यभर घबराट निर्माण करणा-या स्वाइन फ्लूनं पुण्यानंतर आज मुंबईत आपला दुसरा बळी घेतला. H1N1 पॉझिटिव्ह असलेल्या फमिदा पानवाला यांचं संध्याकाळी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्या ५३ वर्षांच्या होत्या. या मृत्यूमुळे मुंबईकर चांगलेच धास्तावलेत.

गेल्या काही दिवसांपासून फमिदा यांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, कालपासून त्यांची तब्येत हळूहळू खालावत गेली. स्वाइन फ्लूची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना काल कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. परंतु, त्यांच्याकडून औषधोपचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला.

फमिदा यांचा हा मृत्यू नेमका स्वाइन फ्लूमुळेच झाला की हायपर टेन्शन आणि डायबिटीसमुळे, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. फमिदा H1N1 पॉझिटिव्ह असल्याचं नेमकं कधी निष्पन्न झालं?,त्यानंतर लिलावतीमधल्या डॉक्टरांनी काय उपचार केले?, त्यांना कस्तुरबामध्ये हलवण्याचा निर्णय उशिरा घेण्यात आला का ?, कस्तुरबामध्ये त्यांच्यावर काय ट्रिटमेंट करण्यात आली?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आता सुरू आहे.

लिलावती हॉस्पिटलमध्ये फमिदा व्हेंटिलेटरवर असतानाच, डॉक्टरांना स्वाइन फ्लूचा संशय आला आणि त्यांनी लगेचच त्यांना कस्तुरबामध्ये पाठवलं. तिथून त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आणि त्यातून फमिदा H1N1 पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं, अशी माहिती मुंबईच्या महापौर शुभा राऊळ यांनी दिली आहे.

परंतु, अवघ्या एका दिवसांत फमिदा यांना स्वाइन फ्लू नक्कीच झालेला नसणार. मग त्याची लक्षणं डॉक्टरांच्या आधी लक्षात आली नाहीत का ?, हा मुख्य प्रश्न आहे. फमिदा यांच्या मृत्यूमागे डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशर हीच प्रमुख कारणं असल्याचं आरोग्य अधिका-यांकडून सांगितलं जातंय. एका दिवसांत स्वाइन फ्लूनं मृत्यू होत नाही. त्यामुळे, या मृत्यूला स्वाइन फ्लू कितपत कारणीभूत आहे, हे चौकशीअंतीच सिद्ध होऊ शकणार आहे.

कुणीही घाबरून जाऊ नये, स्वाइन फ्लूच्या मुकाबल्यासाठी आपण सर्वतोपरी सज्ज आहोत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

दरम्यान, पुण्यात रिया शेख या १४ वर्षीय मुलीचा स्वाइन फ्लूनं मृत्यू झाला होता. ती स्वाइन फ्लूची देशातली पहिली बळी ठरली. परंतु, रियाच्या मृत्यूला स्वाइन फ्लूपेक्षा जहांगीर हॉस्पिटलचा हलगर्जीपणाच अधिक जबाबदार ठरला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: