हेमंत आठल्ये

पुण्यात H1N1 चा चौथा बळी

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 11, 2009 at 12:50 सकाळी

म. टा. खास– गेले दोन दिवस पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूच्या H1N1 विषाणूशी नेटानं झुंज देणारे केमिस्ट संजय टिळेकर यांचा अखेर आज संध्याकाळी मृत्यू झाला. स्वाइन फ्लूमुळे झालेला पुण्यातला हा चौथा मृत्यू असून राज्यातल्या बळींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.

हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानं संजय टिळेकर यांना आधी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तिथेच ते H1N1 पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आल्यानं ६ तारखेला त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. परंतु , त्यांची रोगप्रतिकारकशक्ती खूपच कमी झाली असल्यानं त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. पहिल्यापासूनच व्हेंटिलेटरवर असलेल्या संजय यांची हृदयक्रिया आज संध्याकाळी बंद पडली. त्यानंतरही सुमारे अर्धा तास डॉक्टरांनी कृत्रिम श्वासोच्छवास पुरवला , पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांना मृत घोषित करण्यात आलं. ससून हॉस्पिटलमध्ये आणखी सहा स्वाइन फ्लू रुग्ण गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, आज सकाळीच ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाबासाहेब माने यांचा ‘ स्वाइन फ्लू ’ मुळे मृत्यू झाला होता. याआधी पुण्यात रिदा शेख (१४) ही विद्यार्थिनी आणि दौंडच्या शाळेत शिक्षक असलेल्या संजय तुकाराम कोकरे ( ४२ ) यांचा ‘ स्वाइन फ्लू ’ मुळे मृत्यू झाला होता. तर मुंबईत कस्तुरबात उपचार घेत असलेल्या फमिदा पानवाला (५३) या महिलेचा मृत्यू झाला होता. या व्यतिरिक्त रविवारी सकाळी अहमदाबाद येथे प्रविण पटेल या अटलांटाहून आलेल्या एनआरआयचाही ‘ स्वाइन फ्लू ’ मुळेच मृत्यू झाला होता. संजय टिळेकर यांच्या निधनामुळे देशातील स्वाइन फ्लू बळींची संख्या सातवर पोहोचली आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: