हेमंत आठल्ये

मुंबई-बडोद्यात आणखी ‘स्वाइन’ बळी

In बातमी, म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 12, 2009 at 1:41 सकाळी

म. टा. खास– देशातल्या ‘ स्वाइन फ्लू ‘ च्या बळींची संख्या आता ११ झाली आहे . आज संध्याकाळी केरळमध्ये ३३ वर्षीय निस्सार यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे . त्याआधी दुपारी मुंबईत एका महिलेनं आणि बडोद्यात एका ७ वर्षीय मुलीनं आपले प्राण गमावले . आतापर्यंत पुण्यात सर्वाधिक ५, मुंबईत २, गुजरातमध्ये २ आणि चेन्नईत १ आणि केरळमध्ये १ रुग्ण स्वाइन फ्लूची शिकार ठरला आहे.

मुंबईतील भायखळ्याच्या नूर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ६३ वर्षीय सईदा अब्दुल अझिज यांचा आज दुपारी मृत्यू झाला. त्यापाठोपाठ बडोदा येथे आर्या नावाच्या ७ वर्षीय मुलीचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. मंगळवारी मध्यरात्री पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये १३ वर्षीय श्रृती गावडे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.

पुण्याच्या नारायण पेठेत राहणारी श्रुती अहिल्यादेवी शाळेत शिकत होती. ताप आला आणि तब्येत वेगाने खालावत होती म्हणून तिला ससूनमध्ये आणण्यात आले. स्वाइन फ्लूचे निदान झाले त्यावेळी तिला श्वसनाचा त्रास होत असल्याचे आणि ताप वाढल्यामुळे तब्येत खालावल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिला स्वाइन फ्लूग्रस्तांच्या अती दक्षता विभागात व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वसन यंत्रणा) ठेवण्यात आले. तातडीने टॅमिफ्लू गोळ्या देऊन उपचार सुरू करण्यात आले. मात्र या उपचारांना तिने प्रतिसाद दिला नाही.

स्वाइन फ्लूचे पुण्यातील बळी
रिदा शेख (१४) – सेंट अॅन्स शाळेची विद्यार्थीनी
संजय तुकाराम कोकरे (४२) – दौंडच्या शाळेतील शिक्षक
बाबासाहेब लक्ष्मण माने – डॉक्टर
संजय टिळेकर ( ३५ ) – केमिस्ट
श्रुती गावडे (१३) – अहिल्यादेवी शाळेची विद्यार्थीनी

स्वाइन फ्लूचे मुंबईतील बळी
फमिदा पानवाला ( ५३ )
सईदा अब्दुल अझिज (६३)

स्वाइन फ्लूचे गुजरातमधील बळी
प्रविण पटेल, अहमदाबाद – अटलांटाहून आलेला एनआरआय
आर्या, बडोदा (७)

स्वाइन फ्लूचा चेन्नईतील (तामिळनाडू) बळी
बी संजय (४) – अक्षया शाळेचा विद्यार्थी

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: