हेमंत आठल्ये

पुण्यात स्वाइन फ्लूचा १२ वा बळी

In बातमी, म. टा. खास, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 13, 2009 at 5:28 pm

म. टा. खास– पुण्यातला स्वाइन फ्लूचा पाश आणखी आवळला जात असून गुरुवारी सायंकाळी आणखी एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला . यामुळे आतापर्यंत स्वाइन फ्लू बळींची संख्या पुण्यात १२ , तर देशभरात २१ झाली आहे .

रांजणगावच्या अर्चना कोल्हे या ३७ वर्षाच्या महिलेला पुण्यातील श्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते . सोमवारी १० ऑगस्टला त्याची स्वाइन फ्लूची टेस्ट पोझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुण्यात आणण्यात आले . त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते . पण सायंकाळी पावणे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला .

दरम्यान आज स्वाइन फ्लूने बंगळुरूमध्येही शिरकाव केला . यामुळे २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे . रुपा असे या महिलेचे नाव असून तिला स्वाइन फ्लू झाल्याने सेंट फिलोमेना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते .

दरम्यान पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर कायम असून गेल्या बारा तासात दोन जणांना प्राण गमावावे लागले आहे . यात एका ७५ वर्षीय महिलेचा आणि नऊ महिन्याच्या संशयीत बालकाचा समावेश आहे . यामुळे पुण्यात स्वाइन फ्लूमुळे बळी पडलेल्यांची संख्या १२ तर महाराष्ट्रातील संख्या १६ वर पोहचली आहे .

भारती गोयल या ७५ वर्षीय महिलेला रात्री दोन वाजता ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते . त्यांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले होते . त्यांचे आज सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले . ससूनला दाखल करण्यापूर्वी त्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या . त्यांना दम्याचा त्रास होता . त्या येरवड्यात राहत होत्या .

दरम्यान , ऋत्विक कांबळे या नऊ महिन्याच्या बालकाचा स्वाइन फ्लू होऊन झाल्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे . ऋत्विक कांबळे याला ससून ह़ॉस्पिटलमधून सह्याद्री मुनोत हॉस्पिटल दाखल करण्यात आले होते . काल रात्री पावणे नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली . कोथरुडमधीळ शिवतिर्थ नगरमध्ये राहणा या ऋत्विकचा मेडिकल रिपोर्ट यायचा आहे . त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका स्वाइन फ्लूने झाला आहे का हे स्पष्ट होईल .

Advertisements
  1. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या समजू शकेल काय??

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: