हेमंत आठल्ये

स्वाइन फ्लूची साथ अजून आटोक्‍यात नाही – शर्वरी गोखले

In बातमी, सकाळ, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 16, 2009 at 3:01 सकाळी

सकाळ – राज्यात स्वाइन फ्लूची साथ अजून आटोक्‍यात आली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव शर्वरी गोखले यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ६९ रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये पुण्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. स्वाइन फ्लूवर उपचारांसाठी आता राज्यातील २२ खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईतील ११ खासगी रुग्णांलयांमध्ये ११० खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुण्यातील केईएम रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांवर उपचारांसाठी सहा आणि स्वाइन फ्लूग्रस्त रुग्णांसाठी तीन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याचप्रमाणे भारती हॉस्पिटलमध्ये १२ अधिक १० आणि शेठ रामदास शहा रुग्णालयामध्ये १६ अधिक पाच अशा एकूण ४३ खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्या मोफत देण्यात येतील. मात्र, रुग्णालयाचा इतर खर्च संबंधित रुग्णांना करायचे असल्याचेही गोखले यांनी स्पष्ट केले.
पुण्यामध्ये सध्या एकूण ४३ रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल असून, त्यापैकी २६ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य १७ रुग्णांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या १८ रुग्णांपैकी १२ रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे गोखले यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या दोन रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि चौघांच्या घशातील आणि नाकातील द्रवपदार्थांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात स्वाइन फ्लूचे आजपर्यंत ८३० रुग्ण दाखल झाले. पैकी ६२९ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आल्याचेही गोखले यांनी सांगितले.
————————
औरंगाबादेत संशयित स्वाइन फ्लू रुग्णाचा मृत्यू
औरंगाबाद – स्वाइन फ्लूची लक्षणे जाणवत असलेल्या एका रुग्णाचा शुक्रवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) मृत्यू झाला. गुरुवारी रात्री हा रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल झाला होता.
घाटी रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सुदाम माणिक काळे (वय ४०, रा.आष्टी) हे वॉर्ड सहामध्ये दाखल झाले. त्यांना ताप, दम लागणे आदी त्रास सुरु होता. ही न्यूमोनिआचीही लक्षणे असू शकतात. सध्या ‘स्वाइन फ्लू’मुळे सर्वत्र दक्षता बाळगण्यात येत आहे. आम्ही संबंधित रुग्णाच्या घशातील आणि नाकातील द्रवपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. उपचारादरम्यान शुक्रवारी या रुग्णाचा मृत्यू झाला.
पुणे येथून नमुने तपासणीचा अहवाल आल्यानंतरच या रुग्णाचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला की नाही हे कळू शकेल. दरम्यान आणखी दोन संशियत रुग्ण सध्या घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सहामध्ये दाखल आहेत.
———————
पुण्यात अघोषित संचारबंदी
पुणे – ‘स्वाइन फ्लू’च्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरामध्ये उद्यापासून सक्तीची संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची अफवा आज शहरामध्ये पसरली होती. पोलिस आणि पालिका प्रशासनाने त्याचा इन्कार केला असला, तरीही शहरातील बहुतेक भागांतील व्यापाऱ्यांनी मात्र आपले व्यवसाय पुढील तीन दिवस बंद ठेवणार असल्याची घोषणा केल्याने शहरामध्ये अघोषित संचारबंदीच होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, पुणे लष्कर, गुलटेकडी मार्केट यार्ड, तपकीर गल्ली येथील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवणार असल्याचे आज जाहीर केले. पुण्यातील सराफ संघटनेने यापूर्वीच “बंद’जाहीर केला असून, भांडी व धातू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही बंद जाहीर केला आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील कापड, साडी आणि रेडिमेड कपडे विक्रेत्यांनी दोन दिवस, तर तुळशीबागेतील व कॅंपमधील व्यावसायिकांनी पुढील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “स्वाइन फ्लू’च्या दहशतीमुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. खाद्यप्रेमी पुणेकरांनी पाठ फिरवल्याने हॉटेल व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या कार्यालयीन वेळा सोडल्यास इतर वेळी रस्त्यांवरील गर्दीही ओसरल्याचे चित्र आहे. मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता या बाजारपेठांसह उपनगरांतील मुख्य रस्त्यांवरही गुरुवारी नागरिकांचा तुरळक वावर दिसून येत आहे.
गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड पुढील दोन दिवस बंद राहणार आहे. दरम्यान, श्रावणातील सण, तसेच सत्यनारायणाच्या पूजेस लागणारे साहित्य आणि भाजीपाला खरेदीसाठी मंडई परिसरात महिलांची सकाळी गर्दी होती. पावसाळा आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या मॉलमध्ये, तसेच कपड्यांच्या दुकानांत अनेक सेल सुरू असले तरीही ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांकडे पाठ फिरविल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवण्या सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचा मोठा परिणाम शहरातील वाहतुकीवरही दिसून येत आहे.
ाभाई शहा यांनी दिली. कापड विक्रेत्यांसह इतर लहान-मोठ्या व्यावसायिकांनीही पुढील दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स असोसिएशन (सीएमडीए) या संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत सातभाई यांनी संगणक व त्याचे सुटे भाग विकणारे शहरातील विक्रेते, वितरकांना १६ ऑगस्टपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, शहरातील प्रसिद्ध तुळशीबाग परिसरातील दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यावसायिकांच्या संघटनेच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरसेविका माधुरी मिसाळ, रवी रणधीर यांनी कळविली आहे. महात्मा गांधी रस्ता (कॅंप) परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी १४ ते १६ ऑगस्ट हे तीन दिवस आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे पुणे कॅंप मर्चंट असोसिएशनचे सचिव अरुण सुत्रावे यांनी कळविले आहे.
खडकी बाजार परिसरातील कपड्याची दुकाने येत्या सोमवारपर्यंत (ता. १७) बंद ठेवण्याचा ठराव खडकी कपडा मार्केट असोसिएशनच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष श्‍याम आगरवाल यांनी ही माहिती कळविली आहे.
गणेश कला क्रीडा मंच आणि बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुढील शनिवारपर्यंत (ता. २२) बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
———————————————–
पुण्यात पुन्हा २४ तासांमध्ये ५ बळी
पुणे – स्वाईन फ्लूच्या संसर्गाने पुण्यात २४ तासामध्ये पुन्हा पाच जणांचा बळी गेला. त्यापैकी दोघे संशयित रुग्ण आहेत. बुधवारी दिवसभरातही पाच जणांचे बळी गेले होते. यामुळे पुण्यामधील बळींची संख्या चौदावर पोचली आहे. दरम्यान, आज तपासणीत ७३ नवे रुग्ण आढळले. त्या व्यतिरिक्त सर्व रुग्णालयांत १२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पारूबाई मारूती शिंदे (वय ७०, गणेशनगर, येरवडा) यांचे काल रात्री पावणे अकरा वाजता औंध येथील रुग्णालयात निधन झाले. त्याचवेळी प्रभाकर वैरागर (वय ४४, वडगाव बुद्रुक) यांचेही ससूनमध्ये निधन झाले. दोघांचीही स्वाईन फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
अर्चना कोल्हे (वय ३७, रा. रांजणगाव) या मृत्युमुखी पडल्या असून, पुण्यात आतापर्यंत “स्वाइन फ्लू’चा संसर्ग झालेले बारा जण मृत्युमुखी पडले आहेत. कोल्हे यांनी एका खासगी रुग्णालयात औषधोपचार घेतला. प्रकृती खालावल्याने दहा ऑगस्टला त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांचे आज दुपारी पावणेचार वाजता निधन झाले.
वडगाव बुद्रुक येथील रहिवासी प्रभाकर वैरागर (वय ४४) यांना बुधवारी रात्री ससुन रुग्णालयात दाखल केले होते, त्यांचे गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजता निधन झाले.
भारती गोयल (वय ७५, रा. येरवडा) आणि स्वाभिमान कांबळे (वय ९ महिने) हे दोघे संशयित रुग्ण मृत्युमुखी पडले. त्यांना “स्वाइन फ्लू’चा संसर्ग झाला आहे की नाही, याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
“मेक्‍सिको मॉडेल’ अवलंबणार का, अशी विचारणा केली असता, महापालिका आयुक्त डॉ. महेश झगडे म्हणाले, “मेक्‍सिको किंवा ब्रिटन मॉडेल आम्ही वापरत नाही. आम्ही जे उपाय योजत आहोत, त्याला तुम्ही “पुणे मॉडेल’ म्हणा. प्रशासन आणि प्रसिद्धिमाध्यमे लोकांना जास्तीत जास्त जागृत करीत आहेत. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद ठेवून गर्दी टाळण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन लोकांना केले जात आहे.”
“पुण्यात आजपर्यंत ५० हजार ४२१ लोकांची तपासणी महापालिकेच्या २३ केंद्रांवर करण्यात आली. गेल्या २४ तासांत त्यापैकी ११ हजार ६१ जणांना तपासण्यात आले. ज्या लोकांना संसर्ग झाला आहे अशी शक्‍यता वाटते, त्यांचा तपासणी अहवाल येण्याची वाट न पाहता, तातडीने टॅमिफ्लू दिली जात आहे. रोज दोन गोळ्या पाच दिवस घेतल्यास “स्वाइन फ्लू’ बरा होतो. रुग्णांनी मात्र पाच दिवस हे औषध घेतलेच पाहिजे. त्यांनी बरे वाटत आहे, असे म्हणून मध्येच गोळ्या घेणे थांबवू नये. तातडीने उपचार सुरू करण्यासाठी हा महत्त्वाचा बदल आम्ही केला आहे. टॅमिफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा देशात आहे. राज्यासाठी नुकत्याच दोन लाख गोळ्या आल्या आहेत. “एन ९५’ मास्क पाठवून देण्यास केंद्र सरकारला कळविले असून, एक हजार मास्क लवकरच मिळणार आहेत.”
उपचार ‘सहाव्या पातळी’चे
समाजात सर्वत्र विषाणूंचा संसर्ग होणे, म्हणजे संसर्गजन्य साथीची सहावी पातळीची स्थिती. त्या वेळी, सर्व संशयितांवर औषधोपचार केले जातात. “स्वाइन फ्लू’ची लक्षणे जास्तीत जास्त सात दिवसांत दिसतात. मात्र, त्या रुग्णापासून त्या आठवड्यात दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे, पंधरा दिवस सर्व संशयितांवर उपचार केल्यास, साथ आटोक्‍यात येते, असे वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांनी सांगितले. तीच उपचाराची पद्धत पुण्यात राबविण्यास प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या सर्व केंद्रांवर संशयितांना टॅमिफ्लू देण्यात येत आहे. सर्व केंद्रांवर उपचार करण्यात येत आहेत, तसेच खासगी डॉक्‍टरांचेही साह्य घेण्यात येत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: