हेमंत आठल्ये

पुन्हा दहशतवादी हल्ल्याची भीती

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 18, 2009 at 10:28 सकाळी

म. टा. खास– मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशात मोठा हल्ला झालेला नसला तरी पाकमधील दहशतवादी संघटना पुन्हा तशा तयारीत असल्याचे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे आपल्याला कमालीचे सावध रहावे लागेल, असा इशारा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला आहे.

अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सोमवारी दिल्लीत झाली. त्यात, गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत पंतप्रधानांनी हा इशारा दिला. ‘भारतात सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे घुसखोर सैनिकांप्रमाणेच प्रशिक्षित असून त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आणि संपर्क उपकरणेही आहेत. या पार्श्वभूमीवर, दहशतवादी असोत की नक्षलवादी, त्यांच्या कारवायांबाबत गुप्तचर यंत्रणांकडून मिळणारी बारीक सारीक माहिती राज्यांना देण्यात केंदाकडून कोणतीही कसूर होणार नाही. राज्य सरकारांनीही त्यांच्याकडील माहितीची देवाणघेवाण केंद आणि अन्य राज्यांसोबत करायला हवी, असे ते म्हणाले.

दहशतवाद आणि नक्षलवादाशी सामना करताना अत्याधुनिक साधनांची थोडीफार कमतरता भासत असली तरी राज्यांना मदत करण्याबाबत आम्ही कधीही हात आखडता घेतलेला नाही. मात्र, प्रत्येक गोष्टीला अखेर काही मर्यादा आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारांनीही आपापल्या यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी बनवण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
……..

* पाकच्या नाकाला मिरच्या झोंबल्या
भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी प्रक्रिया सुरू असताना मनमोहन सिंग यांचे हल्ल्याबाबतचे वक्तव्य अनावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया पाकने नोंदवली.

* महाराष्ट्राला हवेत ५०० कोटी
महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंदाकडे ५०० कोटी रुपयांची मागणी केली. पोलिस संख्येत वाढ, अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदी, दोन लढाऊ हेलिकॉप्टरसाठी हा निधी तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे चव्हाण म्हणाले.

* गुजरातेत नऊ पाकिस्तानींना अटक
भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ पाकिस्तानींना सीमा सुरक्षा दलाने सोमवारी कच्छमधील खाडीत अटक केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: