हेमंत आठल्ये

भरसभेत विलासरावांच्या तोंडावर ‘गोमूत्र’

In म. टा. खास on ऑगस्ट 23, 2009 at 12:46 सकाळी

म. टा. खास– केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या तोंडावर गोमूत्र फेकून कोल्हापूरमध्ये आज एका तरूणाने एकच खळबळ उडवून दिली. काँग्रेसच्या एका जाहीर कार्यक्रमासाठी विलासराव आले असताना, या तरूणाने व्यासपीठावर जाऊन त्यांच्या तोंडावर गोमूत्र शिंपडले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात देशभरात विविध राजकीय नेत्यांवर चप्पल फेकण्याचे प्रकार घडले होते. आपला राग व्यक्त करण्यासाठी सामान्यजनांनी चप्पलफेकीचे अस्त्र उपसले होते. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या तोंडावर गोमूत्र फेकण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या मतदारसंघात उजगावामध्ये एका जाहीर कार्यक्रमासाठी विलासराव देशमुख आले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच, एक तरूण धावत व्यासपीठावर चढला. त्याने आपल्याकडील बाटलीतून आणलेले गोमूत्र विलासरावांच्या तोंडावर फेकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सगळेच बावचळून गेले. या तरूणाला संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी बखोटीला धरून बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र त्या तरूणाचे नाव काय आणि त्याने गोमूत्र का फेकले, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

राजकीय षडयंत्रातून हा प्रकार घडला असावा. हा प्रकार फारसा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया विलासराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या सभेत घुसून एका तरूणाने त्यांच्या तोंडावर गोमूत्र फेकल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गोमूत्राऐवजी या बाटलीत अॅसिड किंवा तत्सम स्फोटक पदार्थ असता तर मोठा गहजब उडाला असता, असे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: