सकाळ– “स्वाइन फ्लू’मुळे शहरात दोन जणींचा रविवारी बळी गेला. त्यात आतापर्यंतचा सर्वांत लहान मुलीचा समावेश आहे. शहरात आत्तापर्यंत 22 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
“स्वाइन फ्लू’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातही आत्तापर्यंत तीन जणांना यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. जिल्ह्यातही या रोगाचा वेगाने प्रसार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“स्वाइन फ्लू’मुळे आज ताई अरुण बागल (जि. नाशिक) या अडीच वर्षांच्या मुलीचा व कमल वागळे (वय 42, रा. बालाजीनगर, पुणे) यांचा मृत्यू झाला.