हेमंत आठल्ये

… तर गोदरेजची उत्पादने विकू देणार नाही

In बातमी, म. टा. खास on सप्टेंबर 1, 2009 at 4:58 pm

म. टा. खास– ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार युनियनमध्ये प्रवेश करणाऱ्या गोदरेजच्या ज्या कामगारांची कंपनीने यूपी-बिहारमध्ये बदली केली आहे, ती ताबडतोब थांबवा नाही तर गोदरेजचे एकही उत्पादन विकू देणार नाही’, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला. ‘हिंमत असेल तर, गोदरेज कंपनीने ताकद आजमावून बघावी’, असे जाहीर आव्हानही राज यांनी दिले आहे.

विक्रोळी येथील कन्नमवार नगरातील पालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलमध्ये लवकरच सुसज्ज अतिदक्षता केंद उभारले जाणार असून या केंदाच्या कामाचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.

कन्नमवार नगरमध्ये डम्पिंग ग्राऊंड आणण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत. त्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये या लोकांना गाडून टाकू, असा इशाराही राज यांनी दिला. वांदे-वरळी सी लिंकला राजीव गांधी यांचे नाव सरकारने दिल्याने त्यांना विरोध करण्यासाठी शिवसेना सावरकरांचे नाव पुढे करत आहे मात्र, बाळासाहेबांनी जर दहा वर्षांपूवीर् हे नाव सुचवले होते तर मग सेनेचे आमदार दहा वषेर् गप्प का बसले, असा सवाल त्यांनी केला.

‘मॉल्स आणि बिल्डरच्या वीज दर कपातीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे मात्र त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांनी घरगुती विजेचे दर कमी करावेत. मी त्यांचे जाहीर आभार मानेन. माझे आमदार निवडून आले तर मी सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम करेन आणि मनसे शिवाय राज्यात कोणताही पक्ष सत्तेवर बसू शकणार नाही’, याचाही पुनरुच्चार राज यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: